जिल्हा रुग्णालय होणार अद्ययावत; ६१ लाखांची सामग्री रुग्णालयाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 11:58 PM2018-12-30T23:58:20+5:302018-12-31T00:03:10+5:30
जगभरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यात संगणकाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. याच संगणक प्रणालीचा वापर सरकारी कामकाजात आणल्यामुळे वेळेबरोबरच पैशांचा अपव्यय टळत आहे.
अलिबाग : जगभरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यात संगणकाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. याच संगणक प्रणालीचा वापर सरकारी कामकाजात आणल्यामुळे वेळेबरोबरच पैशांचा अपव्यय टळत आहे. शिवाय कामे जलदगतीने होतात. याच संकल्पनेतून अलिबागचे जिल्हा सरकारी रुग्णालय आता ई-रुग्णालयात रूपांतरित होत आहेत. याचा सर्वाधिक फायदा रुग्णांसह डॉक्टरांनाही होणार आहे.
जिल्हा रु ग्णालय प्रशासनाला नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी तब्बल ६० लाख ९४ हजार ३५३ रु पयांची सामग्री उपलब्ध झाली आहे. त्यामध्ये ५८ संगणक, दोन प्रिंटर, १० टॅबलेट, दोन सर्व्हर यासह अन्य सामुग्रीचा समावेश आहे. त्यामुळे अलिबागचे जिल्हा सरकारी रुग्णालय लवकरच ई-रुग्णालय होणार आहे. या आधीपासून जिल्हा रुग्णालयामध्ये टेलीमेडिसीनची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, शिवाय कोकण रेल्वे धावते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अपघातातील जखमींना वेळीच उपचार न मिळाल्याने रु ग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. ई-रुग्णालयामुळे ओपीडीत आल्यावर रुग्णाला केसपेपर काढायची गरज भासणार नाही. त्याची सर्वप्रथम संगणकावर नोंद केली जाणार आहे. त्या वेळी त्याला एक युनिक आयडी नंबर दिला जाणार आहे. डॉक्टरांनी संबंधित रु ग्णाची तपासणी केल्यानंतर त्याला कोणती औषधे कोणत्या कारणासाठी दिली आहेत, याची नोंद ते त्यांच्या संगणकावर करणार आहेत. रुग्णावर होणाऱ्या उपचाराचा सर्व लेखाजोखा संगणकाबरोबरच सर्व्हरमध्ये फिड होणार आहे. हे सर्व्हर स्टेशन रुग्णालयातच उभारण्यात येणार आहे. डिस्चार्ज करताना संबंधित रुग्णाला ती फाइल दिली जाणार आहे.
- रोज किती रु ग्ण दाखल झाले, किती डिस्चार्ज केले, तसेच किती पुढील उपचारासाठी पाठवले याची माहिती दररोज अपडेट होणार आहे.
- कोणता रु ग्ण कोणत्या वॉर्डमध्येअॅडमिट आहे. याची माहितीही संगणकाच्या एका क्लिकवर प्राप्त होणार आहे.
- यासाठी प्रत्येक विभागवार एक पासवर्ड देण्यात येणार आहे. भविष्यात सर्व रुग्णालये ई-रु ग्णालये होण्याच्या मार्गावर आहेत.
त्यामुळे रु ग्ण पुणे-मुंबई येथे अधिक उपचारासाठी गेल्यास तेथे त्याने त्याचा युनिक आयडी नंबर अथवा नाव सांगितल्यावर त्याची केस हिस्ट्री उपलब्ध होणार आहे.
याचा अधिक फायदा रुग्णाबरोबरच उपचार करणाºया डॉक्टरांनाही होणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी सांगितले.
ई-प्रणालीचे कामकाज समजून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.