जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८४.९७ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:18 AM2019-05-29T00:18:22+5:302019-05-29T00:18:28+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी सकाळी ऑनलाइन जाहीर झाला.
अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी सकाळी ऑनलाइन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८४.९७ टक्के लागला असून जिल्ह्यात उत्तीर्ण विद्यार्र्थ्यांमध्ये गतवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. विभागवार निकालामध्ये राज्यात कोकण विभागाचा निकाल ९३.२३ टक्के लागून कोकण विभाग अव्वल ठरला आहे.
जिल्ह्यात सर्व शाखांच्या एकूण ३०,८३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी ३०,८०१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत १२६०, प्रथम श्रेणीत ६१७२, द्वितीय श्रेणीत १६,५५३ तर उत्तीर्ण श्रेणीत २१८८ असे ८४.९७ टक्के म्हणजे एकूण २६,१७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ७७.३२ टक्के मुले तर ८९.९९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९०.३० टक्के लागला आहे. उर्वरित शाखांमध्ये कला शाखा ७२.७२ टक्के, वाणिज्य शाखा ८९.२८ टक्के तर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्र म ७७.८२ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत एकूण १०,१३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते, त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेस १०,१२७ बसले. त्यापैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत ४१८, प्रथम श्रेणीत २०६७, द्वितीय श्रेणीत ६१८१ तर उत्तीर्ण श्रेणीत ४८२ असे ९०.३० टक्के म्हणजे एकूण ९१४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कला शाखेत एकूण ८१६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेस ८१४१ बसले त्यापैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत ६५, प्रथम श्रेणीत ८४९, द्वितीय श्रेणीत ४२३७ तर उत्तीर्ण श्रेणीत ७६९ असे ७२.७२ टक्के म्हणजे एकूण ९१४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.वाणिज्य शाखेत एकूण ११,८०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेस ११,७९८ बसले. त्यापैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत ७५८, प्रथम श्रेणीत ३०२८, द्वितीय श्रेणीत ५८२५ तर उत्तीर्ण श्रेणीत ९२२ असे ८९.२८ टक्के म्हणजे एकूण १०,५३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्र म शाखेत एकूण ७३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेस सर्व ७३५ बसले. त्यापैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत १९, प्रथम श्रेणीत २२८, द्वितीय श्रेणीत ३१० तर उत्तीर्ण श्रेणीत १५ असे ७७.८२ टक्के म्हणजे एकूण ५७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याच्या तालुकानिहाय निकाल टक्केवारीत माणगाव तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९०.५९टक्के तर सर्वात कमी ७३.६९ टक्के निकाल खालापूर तालुक्याचा लागला आहे.
>आयडियल इंग्लिश स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज म्हसळाचा कला विभागाचा निकाल ६७.२१ टक्के लागून दीपक वतारे ७३.८४ टक्के (प्रथम), परशुराम मांडवकर ७२.१५ टक्के (द्वितीय)तर अलिशा जाधव ६८.६९ टक्के (तिसरी) आली आहे. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९९.३८ टक्के लागला असून संदेश बोर्ले ८४.३०टक्के (प्रथम), सूरज आंग्रे ८३.२३ टक्के (द्वितीय)आणि मीनाक्षी जैन ८१.६९ टक्के (तिसरी)आली.
अंजुमन-इ-इस्लाम जंजिरा कला,विज्ञान आणि वाणिज्य ज्युनिअर कॉलेज म्हसळा येथील विज्ञान शाखेतून बशरा मन्सुर शिर्शिकार हिने ७४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, यासर मुसद्दीक इनामदार याने ७३.२३ टक्के गुण मिळवून दुसरा तर ७३.०७ टक्के गुण मिळवुन फरीन मुकादम हिने तिसरा क्रमांक पटकावला.
आयडियल इंग्लिश स्कूल म्हसळा यांनी १०० टक्के निकाल लावण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली असून हुदा काळोखे हिला ८२.७६ टक्के गुण मिळून प्रथम, सिद्रा काझी हिला ७८.७६ टक्के गुण मिळून दुसरी तर युसूफ दामाद यास ७५.८४ टक्के गुण मिळून तिसरा क्रमांक पटकावला.
मौलाना आझाद हायस्कूल पांगळोली येथून हवा फवाज एजाज यास ७१.५३ टक्के गुण मिळून प्रथम, ताहरीन म.इशाक ६८.४६ गुण मिळवून दुसरी तर निडा अस्लम धनशे हिस ६८ टक्के गुण मिळून तिसरा क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी जमीर कादिरी, समीर बनकर, नसीर मिठागरे, फझल हालडे, बी.एन.माळी, याकूब खान आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन के ले.
>नेताजी पालकर विद्यालयाचा निकाल ७३.५८ टक्के
मोहोपाडा : चौक येथील यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ७३.५७ टक्के लागला आहे.या कनिष्ठ महाविद्यालयात कला व वाणिज्य या दोन शाखा १२ वीपर्यंत आहेत.
कला शाखेचा ६४.१७ टक्के तर वाणिज्य शाखेचा ८२.१९ टक्के निकाल लागला असून दोन्ही शाखेतून १४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
वाणिज्य शाखेतून सानिया दिवाण ७६.१५ टक्के, माधुरी राणे ७१.३८ टक्के, निशा पवार ६९.२३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आल्या. कला शाखेतून अनिकेत भालेकर ६७.३८ टक्के, प्राची मुकादम ६४.६१ टक्के, अस्मिता डुकरे ५८.९२ टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले. प्राचार्य देवळे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
>पनवेलमध्ये टक्का वाढला
पनवेल तालुक्यातील व्ही. के. हायस्कूल विज्ञान शाखेचा ९२.५४ टक्के, कला शाखेचा ७५.५४ टक्के तर वाणिज्य शाखेचा ९१.८४ टक्के निकाल लागला आहे. चांगू काना ठाकूर विज्ञान शाखेचा ९७. ६५ टक्के, कला शाखा ९६.६१ टक्के, वाणिज्य शाखेचा ९६.३९ टक्के निकाल लागला आहे. बांठिया माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला.