शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती, लेप्टोस्पायरोसिस, स्वाइनचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 2:20 AM

गेला आठवडाभर पावसाने जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये हाहाकार उडवून दिला होता. सतत बरसणाºया पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत होते. आता पाऊस थांबल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : गेला आठवडाभर पावसाने जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये हाहाकार उडवून दिला होता. सतत बरसणाºया पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत होते. आता पाऊस थांबल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाणी साठणाºया ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस, तर ऊन पडल्याने स्वाइन फ्लूचा फैलाव होण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. नागरिकांना कोणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तसेच नेमून दिलेल्या औषधांचा डोस पूर्ण करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी केले आहे.राज्यासह कोकण आणि विशेषत: रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. सातत्याने बरसणाºया पावसाने जिल्ह्यातील २९ पैकी २५ लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असणारी धरणे १०० टक्के भरली. धरणे भरु न वाहत होती. त्याचप्रमाणे सखल भागातील शहरे आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी घुसले होते. पावसाने सर्वत्रच दाणादाण उडवून दिल्याने रस्ते, पूल पाण्यात हरवले होते. पावसाच्या अवकृपेमुळे काही घरांची, गोठ्यांची आणि झाडांची पडझडही मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामध्ये लाखो रु पयांची वित्तहानी झाली. या कालावधीत जिल्हा प्रशासनासह, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा चांगलीच सतर्क झाली होती. पावसाने आता उघडीप दिल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने नागोठणे, रोहे, पाली, पेण, अलिबाग,पनवेल तालुक्यातील काही ठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी साठले आहे. तेथील पाण्याचा निचारा तातडीने न झाल्यास लेप्टोस्पायरोसिससारख्या गंभीर आजाराच्या साथीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. तसेच पाऊस थांबल्याने उन्ह पडत आहे. असे वातावरण स्वाइन फ्लूसाठी पोषक आहे. त्यामुळे जिल्ह्यावर या दोन महाभयंकर साथ रोगाचे सावट पसरले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.साथीचे आजार टाळण्यासाठी उपाययोजनादूषित पाण्यामुळे अनेक आजारांची शक्यता असते. हे आजार टाळण्यासाठी पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरावे. शेतावर कामाकरिता जाताना घरून शुध्द पाणी घेऊन जावे. शेतातील नाले, ओढ्याचे व विहिरीतील पाणी पिण्यास वापरु नये. गावातील विहिरींचे शुध्दीकरण जलसुरक्षकांकडून नियमित करु न घ्यावे. नवीन विहिरीचे पाणी शुध्द केल्यावरच सेवन करावे. घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. उघड्यावर शौचास बसू नये, लहान मुलांना देखील उघड्यावर शौचास बसवू नये, व्यक्तिगत शौचालय बांधून त्याचा वापर करावा. परिसरातील नाले गटारे साचू नयेत याची दक्षता घ्यावी, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा, घरातील सर्व पाणी, पाण्याने भरलेली भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करु न ती कोरडी करु न घ्यावीत. सांडपाण्यासाठी शोषखड्डा खोदावा, उघड्यावरचे अन्न वा शिळे अन्न खाऊ नये. दूषित मांस व फळे खाऊ नयेत. आजारी व्यक्तींना गरम पाणी द्यावे. अतिसार, थंडी, ताप यासंदर्भातील आजारांवर संबंधित आशा स्वयंसेविका, नर्स, आरोग्य सेवकांकडून उपचार करु न घ्यावा. मात्र उपाय न झाल्यास थेट जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.रु ग्णालयात उपचारासाठी सुविधा उपलब्धनागरिकांनी या आजाराबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. कोणत्याही आजाराची लक्षणे दिल्यास त्यांनी तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करु न घ्यावा. जिल्हा रु ग्णालय प्रशासनाने या दोन्ही गंभीर साथीच्या आजाराची दखल घेतली आहे.त्यानुसार रु ग्णालयात उपचाराच्या सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. खबरदारी त्यातील महत्त्वाचा उपाय असल्याचेही डॉ. गवळी यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यामध्ये अद्याप या आजाराची लक्षणे असलेले रु ग्ण आढळले नाहीत.कोकणातील वातावरण आणि नागरिकांमध्ये या आजारांबाबत असलेली जनजागृती त्यामुळे या आजारांना दूर ठेवता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.1लेप्टोस्पायरोसिस हा जंगली प्राण्यातून पाळीव प्राण्यांमध्ये येतो. त्यानंतर त्यांच्याकडून तो मानवाला होतो. आजघडीला उंदीर आणि घुशी हे लेप्टोस्पायरोसिसचे मुख्य संसर्गस्रोत मानले जातात. आजारामध्ये सौम्य ताप ते तीव्र कावीळ, मूत्रपिंड, फुप्फुसे निकामी होणे यासारख्या गंभीर स्वरु पाच्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात.2लेप्टोस्पायरोसिस हा आजार दोन टप्प्यांमध्ये आढळून येतो. पहिल्या टप्प्यात रु ग्णाला अचानक थंडी वाजून तीव्र ताप येतो. डोके दुखते, उजेडात डोळे उघडणे कठीण जाते. डोळ्यांमध्ये तीव्र वेदना होतात. तिसºया, चौथ्या दिवशी डोळ्यांमध्ये रक्त साकळते, रु ग्णाला मळमळ, उलट्या आणि जुलाब होतात, भूक मंदावते, स्नायू, सांधे दुखू लागतात, खोकला आणि दम लागतो, त्वचेवर गोवरसदृश पुरळ उठते.