रायगड जिल्ह्यात शिक्षक बदली घोटाळ्याचे रॅकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 06:44 AM2018-05-11T06:44:30+5:302018-05-11T06:44:30+5:30
रायगड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीतील घोटाळ्याबाबत तपास संथगतीने होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेमधील हे बदली घोटाळ्याचे रॅकेट प्रचंड मोठे आहे, परंतु तीन महिने उलटले तरी, अलिबाग पोलिसांना गुन्हेगार सापडत नसल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली आहे.
अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीतील घोटाळ्याबाबत तपास संथगतीने होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेमधील हे बदली घोटाळ्याचे रॅकेट प्रचंड मोठे आहे, परंतु तीन महिने उलटले तरी, अलिबाग पोलिसांना गुन्हेगार सापडत नसल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बाब माजी आमदार ठाकूर यांनी उघडकीस आणली होती. २१ शिक्षकांच्या बदलीसाठी तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या बनावट सह्या आणि शिक्के वापरण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी प्रखर विरोध केल्याने अखेर शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी अलिबाग पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
बनावट सह्या केल्याप्रकरणी अलिबाग पोलिसांत तक्र ार दाखल करणाऱ्या शिक्षण विभागाने तक्र ारच अशी दाखल केली आहे की ती निकाली निघावी. कारण बनावट सह्यांचे आदेश सादर करणाºया शिक्षकांची यादी शिक्षण विभागाकडे आहे आणि गेली दोन वर्षे चौकशी सुरू आहे तर या शिक्षकांनी त्यांना मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सहीची बनावट पत्रे शिक्षण विभागाकडील कोणत्या व्यक्तीने दिली हे सांगितलेले नाही हे म्हणणेच तकलादू असल्याचे सावंत यांनी सांगितले.
अधिकारी रजेवर
तक्र ार दाखल करणारे शिक्षण अधिकारी हे रजेवर गेले असल्याने या प्रकरणात विलंब झाला होता. आता लवकरच तपासाचे परिणाम दिसून येतील, अशी माहिती दीड महिन्यापूर्वी अलिबागमधील पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी २४ मार्च रोजी दिली होती.