- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा भात पिकांना चांगलाच तडाखा बसला आहे. वादळी वाºयासह पडणाºया पावसाने एक लाख १० हजार हेक्टरपैकी तब्बल ३० टक्के पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा चांगलाच हवालदिल झाला आहे. निर्सगाच्या अवकृपेमुळे शिवारातील पिकाचे झालेले नुकसान पाहण्यापलीकडे शेतकºयांच्या हातात काहीच नसल्याने त्यांना कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या १५ दिवसांपासून अधूनमधून पावसाचा तडाखा बसत आहे. त्यामुळे भात पिकाला त्याचा चांगलाच फटका बसत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये एक लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी विक्रमी पीक येणार असल्याचे आडाखे कृषी विभागासह शेतकºयांनी बांधले होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतातील पीक झोपले आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक तडाखा हा पेण, रोहे आणि माणगाव या तालुक्यांना बसला आहे. या विभागातील शेती सखल भागात केली जाते. त्यामुळे त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत असल्याने भात पिकाचे नुकसान झाले आहे.एक लाख १० हजार हेक्टरपैकी ३० टक्के, म्हणजेच ३३ हजार हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाला परतीच्या पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. एका हेक्टरमधून सुमारे ३० क्विंटल भाताचे पीक येते. त्यानुसार ३३ हजार हेक्टरवरील नऊ लाख ९० हजार क्विंटल भाताचे नुकसान झाल्याचे दिसून येते.परतीच्या पावसाने जिल्ह्यातील भाताचे पीक निश्चितच धोक्यात आले आहे. पाऊस अधूनमधून बरसत असल्याने पिकाला जास्त धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असल्याचे कृषी विभाग (आत्मा)चे संचालक मंगेश डावरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्ह्यात आतापर्यंत ३० टक्के नुकसान झाल्याचे दिसून येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणातील हे आर्थिक नुकसान ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.परतीच्या पावसाने भात पिकाचे चांगलेच नुकसान केले आहे. वादळी वाºयासह बरसणाºया पावसामुळे शेतातील पीक पुरते आडवे झाले आहे. शेतकºयांना फार मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे, असे अलिबाग तालुक्यातील भिलजी गावचे शेतकरी अनंत पुनकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शेतामध्ये विविध जातींच्या भात पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे प्रत्येक जातीच्या भात पिकाचा दर हा वेगळा आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसानही कमी-अधिक प्रमाणात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.परतीच्या पावसाच्या तडाख्याने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी कृषी विभागाने तातडीने सुरुवात करणे गरजेचे असल्याचे शेतकरी प्रशांत भोईर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शेतात पाणी साचल्याने शेतकरी चिंतेत : गुरांच्या चाºयाचाही प्रश्न ऐरणीवरमोहोपाडा : रसायनी व आसपासच्या परिसरात भातशेती फुलून कापणीला आली आहे. बळीराजा आपल्या शेतातील धान्य कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे ठेवून उर्वरित धान्य भातबाजारात विक्र ीसाठी पाठवतो. मात्र, सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या पिकाची नासाडी होण्याची भीती व्यक्त होत आहे. काही ठिकाणी भातशेती कापल्याने शेतात पाणी साचून भातलोंब्यांना अंकुर फुटत आहेत. यामुळे भाताच्या दाण्यांसमवेत पेंढाही कुजत आहे.निसर्गाने रौद्ररूप धारण केल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतातील भातपीक वादळवारा व पावसामुळे शेतात आडवे झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून, यंदा गुरांच्या चाºयांचा प्रश्नही ऐरणीवर येणार असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.दासगावला पुन्हा पावसाने झोडपलेदासगाव : गेले १५ दिवस महाड तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. शुक्रवारी थोडी विश्रांती घेतल्यानंतर शनिवारी दासगाव परिसरात पावसाने जोरदार इन्ट्री केली. महाड तालुक्यात दरदिवशी विजेच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. सध्याचा पाऊस शहरी भागात कमी मात्र ग्रामीण तसेच डोंगर भागात मोठ्या प्रमाणात पडत आहे. काही दिवसांपूर्वी विन्हेरे विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस होता. वीज कोसळून दोन नागरिकांचे बळीदेखील गेले होते. दरवर्षी हा परतीचा पाऊस सप्टेंबरअखेरपर्यंत जरी असला, तरी आॅक्टोबर महिना सुरू झाला की, तुरळक पाऊस लागून निघून जातो. मात्र, यंदा त्या उलटच झाले असून आॅक्टोबर महिना निम्मा संपला तरी पावसाचे धुमशान सुरू आहे.शनिवारी महाड तालुक्यातील केंबुर्लीपासून विर अशा १० कि.मी.च्या परिसराला मोठ्या प्रमाणात झोडपून काढले. संध्याकाळी ४ वा. सुरू झालेला पाऊस१ तास विजेच्या गडगडाटासह होता.एक विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीत विन्हेरे विभागात डोंगर भागात मोठ्या प्रमाणात डोंगर भागात पाऊस होता. डोंगर भागातून निघणारे ओढे मोठ्या प्रमाणात वाहू लागले. तसेच महामार्गालगत असलेल्या धबधब्यालाही मोठ्या प्रमाणात पाणी आले. तीच परिस्थिती दासगावमध्ये होती. डोंगर भागातून निघणाºया नदीला मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी वाहू लागले. तसेच गावातील अनेक भागात रस्त्यावर पाणी साचल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. काळभैरव मंदिरामोर जुना न्हावी कोंड, बामणे कोंड येथे जाण्याचा पायी साकव हा देखील डोंगर भागातून येणाºया नदीच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेला होता. त्यामुळे काही काळ या साकवावरून ये-जा बंद होती.
जिल्ह्यात कोट्यवधींच्या पिकाची नासाडी, एक लाख १० हजार हेक्टरपैकी तब्बल ३० टक्के पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 2:40 AM