नळजोडणीमुळे रस्त्यावर खड्डे

By admin | Published: January 25, 2017 05:00 AM2017-01-25T05:00:56+5:302017-01-25T05:00:56+5:30

मुरुड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोर्लीच्य हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता खणून नळ जोडणी घेतली जात असल्यामुळे

Ditch on the road due to nausea | नळजोडणीमुळे रस्त्यावर खड्डे

नळजोडणीमुळे रस्त्यावर खड्डे

Next

बोर्ली-मांडला /मुरुड : मुरुड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोर्लीच्य हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता खणून नळ जोडणी घेतली जात असल्यामुळे त्या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याकडे संबधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांसह वाहन चालक संतप्त झाले आहे.
बोर्ली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मौजे बोर्ली स्थानक ते बोर्ली फाटा दरम्यान राहणाऱ्या रहिवाशांनी ग्रामपंचायतीकडून नळ जोडणी घेतली आहे. मात्र ही जोडणी घेताना सार्वजनीक बांधकाम विभागाची परवानगी घेणे गरजेची आहे. त्यासाठी बांधकाम विभागाकडे काही शुल्क भरावे लागते, मात्र हे शुल्क बुडवून आपल्या फायद्यासाठी संबंधितांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या मुरु ड साळाव या राज्य महामार्गांवरील रस्ता खणून नळजोडणी घेतली आहे. नळ जोडणी घेतल्यानंतर त्याठिकाणी रेती सिमेंट किंवा माती टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र घेतलेली नळजोडणीचे पाइप हे जास्त खोल नसल्यामुळे त्या पाइपवरून एखादे अवघड वाहन गेल्यास ते पाइप फुटून त्यातून पाणी वाया जात असते. तसेच पाइपमधून येणारे पाणी हे त्या ठिकाणी साचवून राहिल्याने खड्डे पडून रस्त्याची वाताहत झाली आहे.

Web Title: Ditch on the road due to nausea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.