दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा आणि दुहेरी खून खटला: अखेर १० आरोपींना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:00 AM2017-10-14T03:00:10+5:302017-10-14T03:00:26+5:30

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा आणि दोन खून झाल्यानंतर या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या गणेश मूर्तीचे काय झाले याबाबत विविध वृत्त प्रसिध्द झाले.

 Divaagar Gold Ganesh Durda and double murder case: Finally punishment to 10 accused | दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा आणि दुहेरी खून खटला: अखेर १० आरोपींना शिक्षा

दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा आणि दुहेरी खून खटला: अखेर १० आरोपींना शिक्षा

Next

जयंत धुळप
अलिबाग : दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा आणि दोन खून झाल्यानंतर या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या गणेश मूर्तीचे काय झाले याबाबत विविध वृत्त प्रसिध्द झाले. अखेर या प्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. राज्यभर गाजलेल्या प्रकरणातील १२ पैकी १० आरोपींना मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश किशोर पेठकर यांनी दोषी ठरविले. सोमवारी १६ आॅक्टोबर रोजी अंतिम निकाल देण्यात येणार आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) मधून या सर्व आरोपींची मुक्तता केलीे.
उर्वरित कलमांन्वये न्यायालयाने दोषी ठरवलेल्या १२ पैकी १० आरोपींमध्ये नवनाथ विक्र म भोसले (३२, रा.घोसपुरी,अहमदनगर), कैलास विक्र म भोसले (२९, रा.घोसपुरी, अहमदनगर), छोट्या ऊर्फ सतीश जैनू काळे (२५, बिलोणी,औरंगाबाद), आनंद अनिल रायमोकर (३८, बेलंवडी, श्रीगोंदा, अहमदनगर), अजित अरु ण डहाळे (२८, श्रीगोंदा, अहमदनगर), विजय ऊर्फविज्या बिज्या काळे (२८, श्रीगोंदा, अहमदनगर), ज्ञानेश्वर विक्र म भोसले (३४, घोसपुरी,अहमदनगर), खैराबाई विक्रम भोसले (५६, घोसपुरी,अहमदनगर), कविता ऊर्फ कणी राजू काळे (४४, हिरडगाव, श्रीगोंदा, अहमदनगर) आणि सुलभा शांताराम पवार (५६, श्रीगोंदा, अहमदनगर) यांचा समावेश असल्याची माहिती सरकार पक्षाकडून या खटल्याचे न्यायालयात काम पहाणारे रायगड जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी दिली आहे. न्यायालयाने दोषमुक्त केलेल्या दोघांमध्ये गणेश विक्र म भोसले (२६, घोसपुरी,अहमदनगर) आणि विक्र म हरिभाऊ भोसले (६६,घोसपुरी, अहमदनगर) यांचा समावेश असल्याचे अ‍ॅड.पाटील सांगितले.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुप्रसिध्द सुवर्ण गणेश मंदिरात ही घटना २४ मार्च २०१२ रोजी रात्री ही घटना घडली. मंदिराचे पहारेकरी महादेव घडशी आणि अनंत भगत या दोघांचा लोखंडी पहारींनी खून करुन सुवर्ण गणेशाची १ किलो ३२५ ग्रॅम सोन्याची प्राचीन मूर्ती व २२५ ग्रॅम वजनाचे अन्य सोन्याचे दागिने असा ११ लाख २० हजार रु पये किमतीचा ऐवज या दरोडेखोरांनी लुटून नेला होता. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस स्टेशनमध्ये १२ जणांविरुध्द भादंवि कलम ३९६, ३९७, १२० ब, २०१, ४१२ आणि महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा १९९९ अर्थात मोक्काच्या कलम ३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
श्रीवर्धनचे तत्कालीन पोलीस उप विभागीय अधिकारी व नाशिक ग्रामीण पोलीसचे विद्यमान अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, दिघा सागरी पो. ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व इगतपुरी (नाशिक) पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन आॅक्टोबर २०१२ मध्ये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

Web Title:  Divaagar Gold Ganesh Durda and double murder case: Finally punishment to 10 accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.