दिवेआगर निसर्गरम्य समुद्रकिनारा होणार स्मार्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:51 AM2018-04-05T06:51:30+5:302018-04-05T06:51:30+5:30
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध सुवर्ण गणेशाने पावन झालेला श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरचा समुद्रकिनारा आता सोयी-सुविधायुक्त होणार असून येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही गैरसोय होवू नये
बोर्ली पंचतन - रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध सुवर्ण गणेशाने पावन झालेला श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरचा समुद्रकिनारा आता सोयी-सुविधायुक्त होणार असून येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी सागरतट निधी, जिल्हा परिषद निधी तसेच १४ व्या वित्त आयोगातील निधीतून विविध विकासकामे आता पूर्ण झाली आहेत.
विविध विकासकामांचे लोकार्पण आणि समुद्रकिनारी राज्यस्तरीय वाळू शिल्पे व तालुकास्तरीय वाळू किल्ले स्पर्धेचे आयोजन ७ एप्रिल २0१८ रोजी करण्यात आले असून याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे व रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे या उपस्थित राहणार आहेत.
दिवेआगर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ असून समुद्रकिनारी पर्यटकांना असुविधा व गैरसाय होत होती, परंतु आता सागरतट निधीमधून तसेच रायगड जिल्हा परिषद फंड व ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये १४व्या वित्त आयोगातून मराठी शाळा क्र मांक १ व २ ना प्रत्येकी १ लॅपटॉप, प्रोजेक्टर, व पडदा तर दोन अंगणवाड्यांना प्रत्येकी १0-१0 बेंचेस तसेच अंगणवाडी नंबर १ मध्ये सॅनिटरी नॅपकिन मशिन व विघटन मशिन बसविण्यात येणार आहे. पर्यटकांच्या दृष्टीने व दिवेआगर समुद्रकिनारी सागरतट अभियान अंतर्गत निधी व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध निधीमधून तळाणी व हनुमान पाखाडी किनाºयाजवळ खुल्या व्यायाम शाळा तसेच ज्या भागात पर्यटकांची जास्त प्रमाणात वर्दळ असते अशा रूपनारायण, हनुमान पाखाडी व तळाणी विभाग येथील समुद्रकिनारी एकूण १0 शौचालये व ३ चेंजिंग रूम्स तसेच जिल्हा परिषदेच्या
ग्रामीण पर्यटन निधीतून ४ शौचालये, ४ चेंजिंग रूम्स, ४ मुताºया त्याचप्रमाणे तीन ठिकाणी एकूण १0 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. दोन ठिकाणी धोक्याचा इशारा देण्यासाठी सायरन, मोबाइल चार्जिंग सेंटर, १0 कचरा कुंड्या, समुद्रकिनारी आरामदायी खुर्च्या, अपंगांसाठी ४ व्हील चेअर्स, समुद्रकिनारी रस्त्याला पथदिवे, पार्किंग व्यवस्था त्याचप्रमाणे दिवेआगर भागामध्ये १0८ विविध प्रकारचे पक्षी नजरेस पडतात. त्यातील १६ पक्ष्यांची फोटोसहित माहिती समुद्रकिनारी लावण्यात येणार आहे. उंटांवर बसण्यासाठी स्टँड, अशा सुविधा दिवेआगरमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत असून दिवेआगर समुद्रकिनारा सुशोभित व स्वच्छ तसेच पर्यटकांसाठी प्रत्येक सोयीयुक्त असा बनविण्याचा मानस सरपंच उदय बापट व त्यांच्या पूर्ण टीमचा असून या सर्व विकास योजनांचे लोकार्पण दिनांक ७ एप्रिल २0१८ रोजी सायंकाळी ५ वाजलेपासून करण्यात येणार आहे तर समुद्रकिनारी राज्यस्तरीय वाळू शिल्पे व तालुकास्तरीय वाळू किल्ले स्पर्धेचे आयोजनही केले असून सदर स्पर्धा दिवेआगर समुद्रकिनारी होणार आहेत.
च्ग्रामीण पर्यटन निधीतून ४ शौचालये, ४ चेंजिंग रूम्स, ४ युरिनल्स, १0 सीसीटीव्ही कॅमेरे दोन ठिकाणी धोक्याचा इशारा देण्यासाठी सायरन.
च्मोबाइल चार्जिंग सेंटर, १0 कचरा कुंड्या, किनारी आरामदायी खुर्च्या, अपंगांसाठी ४ व्हील चेअर्स, समुद्रकिनारी रस्त्याला पथदिवे, पार्किंग व्यवस्था