दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:59 PM2019-04-09T23:59:31+5:302019-04-09T23:59:42+5:30

प्रतिमा पुदलवाड : पेणमध्ये दिव्यांग मतदारांसाठी व्हीव्हीपॅट मशिनची प्रात्यक्षिके

Divya Sangh should vote for voting | दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावावा

दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावावा

Next

पेण : भारताच्या राज्यघटनेने नागरिकांना जे जे अधिकार दिले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा आहे. देशाच्या संविधानाप्रति कर्तव्य बजावून लोकशाही सदृढ करण्यासाठी प्रत्येकाने येत्या लोकसभा निवडणुकीत २३ एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावावा, तसेच पेण विधानसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांसाठी मतदानकेंद्रावर विशेष सुविधा निर्माण केल्याने या मतदारसंघातील तब्बल १२५४ दिव्यांग मतदारांना त्यांच्या पालकांनी अथवा परिवारातील सदस्यांनी मतदान केंद्रावर आणावे, असे आव्हान केंद्रीय राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांना केले आहे.या दिव्यांग मतदार बांधवांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे प्रतिपादन १९१, पेण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी पेण नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या सभेप्रसंगी केले.


दिव्यांग मतदारांसाठी व्हीव्हीपॅट मशिनची प्रात्यक्षिके व प्रत्यक्ष मतदानांची माहिती मिळावी, यासाठी दिव्यांगांसाठी विशेष सभेचे आयोजन निवडणूक आयोगातर्फे पेण नगरपरिषदेच्या सभागृहात करण्यात आले होते. निवडणुका या भारतीय लोकशाहीचा मोठा महोत्सव असून, या महोत्सवात घटनेने १८ वर्षांवरील प्रत्येकास मतदानाचा मोठा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. लोकसभा मतदारयादीमध्ये पेण मतदारसंघात १२५४ दिव्यांग मतदारांची झालेली नोंद रायगड लोकसभा मतदार संघामध्ये सर्वात जास्त प्रमाणात झालेली आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक दिव्यांग मतदार मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी त्याला लागणाऱ्या विशेष सोयीसुविधांची उपलब्धता निवडणूक आयोगातर्फे करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदान केंद्र क्षेत्रातील एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याची खबरदारी सर्वांनी घ्यावयाची आहे. आपले हक्काचे मत व अधिकारी देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याने आपण सर्वांनी या पत्रिक कर्तव्याचे पालन करणे गरजेचे आहे. दिव्यांगासाठी व्हिलचेअर व इतर आवश्यक साधनसामग्री जमवाजमव निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदार केंद्रावर केलेली आहे, त्यामुळे दिव्यांग मतदारांना मतदान अधिकारापासून वंचित ठेवू नका, असे प्रांताधिकारी पुदलवाड म्हणाले.


या वेळी समविचारी अपंग संघर्ष समिती महाराष्टÑ राज्य अध्यक्ष साईनाथ पवार, यांच संघटनेचे पेण तालुकाध्यक्ष अखिल पठाण, पाली सुधागडचे अध्यख शैलेश सोलकर, रोहा तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील, पेण तहसीलदार अरुणा जाधव, पेण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे आदीसह मोठ्या संख्येने अपंग बांधव उपस्थित होते.

दिव्यांग मतदार १०० टक्के मतदान करतील
च्यानंतर मतदार सयंत्र व व्हीव्हीपॅट मशिनद्वारे मतदारांनी केलेले मतदान योग्य ठिकाणी पडते की नाही, याची पडताळणी प्रात्यक्षिके उपस्थितांना दाखविण्यात आली. याचा प्रथमच दिव्यांग मतदारांनी अनुभव घेतला. एकूणच या सभेमध्ये निवडणूक आयोगाने दिव्यांगांना बोलावून त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिल्याने दिव्यांग मतदार १०० टक्के मतदान करतील, असे संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांनी मार्गदर्शनपर भाषणात स्पष्ट केले.

Web Title: Divya Sangh should vote for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :raigad-pcरायगड