शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 11:59 PM

प्रतिमा पुदलवाड : पेणमध्ये दिव्यांग मतदारांसाठी व्हीव्हीपॅट मशिनची प्रात्यक्षिके

पेण : भारताच्या राज्यघटनेने नागरिकांना जे जे अधिकार दिले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा आहे. देशाच्या संविधानाप्रति कर्तव्य बजावून लोकशाही सदृढ करण्यासाठी प्रत्येकाने येत्या लोकसभा निवडणुकीत २३ एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावावा, तसेच पेण विधानसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांसाठी मतदानकेंद्रावर विशेष सुविधा निर्माण केल्याने या मतदारसंघातील तब्बल १२५४ दिव्यांग मतदारांना त्यांच्या पालकांनी अथवा परिवारातील सदस्यांनी मतदान केंद्रावर आणावे, असे आव्हान केंद्रीय राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांना केले आहे.या दिव्यांग मतदार बांधवांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे प्रतिपादन १९१, पेण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी पेण नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या सभेप्रसंगी केले.

दिव्यांग मतदारांसाठी व्हीव्हीपॅट मशिनची प्रात्यक्षिके व प्रत्यक्ष मतदानांची माहिती मिळावी, यासाठी दिव्यांगांसाठी विशेष सभेचे आयोजन निवडणूक आयोगातर्फे पेण नगरपरिषदेच्या सभागृहात करण्यात आले होते. निवडणुका या भारतीय लोकशाहीचा मोठा महोत्सव असून, या महोत्सवात घटनेने १८ वर्षांवरील प्रत्येकास मतदानाचा मोठा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. लोकसभा मतदारयादीमध्ये पेण मतदारसंघात १२५४ दिव्यांग मतदारांची झालेली नोंद रायगड लोकसभा मतदार संघामध्ये सर्वात जास्त प्रमाणात झालेली आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक दिव्यांग मतदार मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी त्याला लागणाऱ्या विशेष सोयीसुविधांची उपलब्धता निवडणूक आयोगातर्फे करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदान केंद्र क्षेत्रातील एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याची खबरदारी सर्वांनी घ्यावयाची आहे. आपले हक्काचे मत व अधिकारी देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याने आपण सर्वांनी या पत्रिक कर्तव्याचे पालन करणे गरजेचे आहे. दिव्यांगासाठी व्हिलचेअर व इतर आवश्यक साधनसामग्री जमवाजमव निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदार केंद्रावर केलेली आहे, त्यामुळे दिव्यांग मतदारांना मतदान अधिकारापासून वंचित ठेवू नका, असे प्रांताधिकारी पुदलवाड म्हणाले.

या वेळी समविचारी अपंग संघर्ष समिती महाराष्टÑ राज्य अध्यक्ष साईनाथ पवार, यांच संघटनेचे पेण तालुकाध्यक्ष अखिल पठाण, पाली सुधागडचे अध्यख शैलेश सोलकर, रोहा तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील, पेण तहसीलदार अरुणा जाधव, पेण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे आदीसह मोठ्या संख्येने अपंग बांधव उपस्थित होते.दिव्यांग मतदार १०० टक्के मतदान करतीलच्यानंतर मतदार सयंत्र व व्हीव्हीपॅट मशिनद्वारे मतदारांनी केलेले मतदान योग्य ठिकाणी पडते की नाही, याची पडताळणी प्रात्यक्षिके उपस्थितांना दाखविण्यात आली. याचा प्रथमच दिव्यांग मतदारांनी अनुभव घेतला. एकूणच या सभेमध्ये निवडणूक आयोगाने दिव्यांगांना बोलावून त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिल्याने दिव्यांग मतदार १०० टक्के मतदान करतील, असे संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांनी मार्गदर्शनपर भाषणात स्पष्ट केले.

टॅग्स :raigad-pcरायगड