अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांची टक्के वारी २०१४ मधील निवडणुकीच्या तुलनेत वाढली आहे.आजवरच्या लोकसभा वा विधानसभा निवडणुकांमध्ये दिव्यांग मतदारांचे केवळ आठ ते नऊ टक्के असणारे मतदान मंगळवारी झालेल्या लोकसभा मतदानात २७ टक्क्यांवर पोहोचून, लोकशाहीतील दिव्यांगांचा सहभाग खऱ्या अर्थाने वृद्धिंगत झाल्याचे दिसून आले आहे.रायगड जिल्ह्यात एकूण नऊ हजार ७०६ दिव्यांग मतदार आहेत. मतदानाच्या दिवशी आपल्या घरून निघून मतदान केंद्रावर येऊन मतदान करून पुन्हा आपल्या घरी पोहोचणे, या प्रवासादरम्यान तसेच मतदान करताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यांना आपला हक्क अत्यंत सुलभतेने बजावता यावा, याकरिता रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विशेष नियोजन केले. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या दिव्यांग मतदार वाहतूक व्यवस्थेच्या विशेष नियोजनाची साथ लाभल्याने आजवरच्या लोकसभा वा विधानसभा निवडणुकांमध्ये दिव्यांग मतदारांचे केवळ आठ ते नऊ टक्के असणारे मतदान २७ टक्क्यांवर पोहोचले आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदान केंद्रनिहाय करण्यात आलेली वाहन व्यवस्था, मतदान केंद्रांवर व्हीलचेअर्स मतदान कक्षात पोहोचण्याकरिता करण्यात आलेले रॅम्प (उतार) आणि ६७८ नवीन व्हीलचेअर्ससह सर्वत्र कार्यरत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि विविध ग्रामपंचायतींचे कर्मचारी यामुळे हे शक्य झाल्याची माहिती, ही व्यवस्था प्रत्यक्ष अमलात आणण्याची जबाबदारी असणारे रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी गजानन लेंडी यांनी दिली आहे.रायगड लोकसभा मतदारसंघपेण विधानसभा११३९अलिबाग विधानसभा१६९७महाड विधानसभा१०३१श्रीवर्धन विधानसभा१८२८रत्नागिरी जिल्ह्यातीलदापोली विधानसभा६१३गुहागर विधानसभा१०८६असे एकूण सात हजार ३९४ दिव्यांग मतदार होते. त्या पैकी एक हजार ७५५ म्हणजे २७ टक्के दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला आहे.
दिव्यांग मतदारांच्या मतदानात झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:01 AM