कांता हाबळे
नेरळ : अपंग आयुक्तालय महाराष्ट्र यांच्याकडून दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र वितरण करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका स्तरावर शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. मात्र, कर्जतमधील शिबिरामुळे तालुक्यातील दिव्यांगांची डोकेदुखी वाढली आहे. पंचायत समितीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका दिव्यांगांना बसला.रायगड जिल्ह्यात ६ फेब्रुवारीपासून पंचायत समिती कार्यालयात शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. १५ फेब्रुवारी रोजी कर्जत पंचायत समिती कार्यालयात दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील सुमारे १५०० दिव्यांगांनी शिबिरात नोंदणी केली होती. सकाळी कर्जत पंचायत समिती कार्यालयात सुमारे २०० च्या वर दिव्यांगांनी हजेरी लावली होती. पंचायत समितीचे नियोजन फसल्याने दिव्यांगाना त्रास सहन करावा लागला.
पंचायत समिती कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला रॅम्प नसल्याने दिव्यांगांना चढा उतरायला त्रास झाला. दुसऱ्या मजल्यावर शिबिरासाठी काही टेबल ठेवण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी पोहोचेपर्यंत दिव्यांगांना घाम फुटला. फोटोची जागेवर सोय नसल्याने लाभार्थींच्या सोबत आलेल्या व्यक्तीचीदेखील धावपळ उडाली. यामुळे पंचायत समिती कार्यालयात एकच गोंधळ उडाला. या गोंधळामुळे अनेक दिव्यांग माघारी गेले. शासनाकडून अनेक योजना नागरिकांसाठी येतात मात्र स्थानिक पातळीवरील नियोजनअभावी नागरिक वंचित राहत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.दिव्यांग शिबिराचे नियोजन २०० जणांच्या सहभाग लक्षात घेऊन करण्यात आले होते. लाभार्थींची दोन ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली होती. मात्र, लाभार्थींसोबत घरातली मंडळीदेखील आली. दुसºया मजल्यावर ज्यांना चढता येऊ शकते, अशा व्यक्तींसाठी सोय केली होती. तर ज्यांना जिने चढता येत नाही, त्यांची खाली सोय केली होती. मात्र ऐनवेळी गडबड झाली. पंचायत समितीच्या मागच्या बाजूस रॅम्प केलेला आहे.- छतरसिंग एस राजपूत, सहायक गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समितीदिव्यांगांचे शिबिर तळमजल्यावर घेतले जावे, अशी अधिसूचना असताना दुसºया मजल्यावर पंचायत समितीने शिबिर ठेवले, यामुळे अपंग बांधवाना त्रास झाला.- अरु ण जोशी, अध्यक्ष अंध अपंग संस्था वारे,शिबिरात जिल्हा शल्यचिकित्सक यांचे पथक अचानक दाखल झाले. त्यामुळे जास्त गोंधळ उडाला. कार्यक्रमाचे आयोजन पटांगणात केले असते तर ते योग्य ठरले असते.- साईनाथ पवार, समाजकल्याण विभाग सहायक, राजिपशिबिरात ठिकाणी प्यायला पाणी, नाश्ता नव्हता. दुसºया मजल्यापर्यंत दिव्यांग चालून जाताना अक्षरश: मेटाकुटीला आले.- अमर साळोखे, शिबिरार्थी, डिकसळ