लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर, पनवेल:वाढत्या प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे.शासन याबाबत उपाययोजनांवर भर देत आहे. न्यायालयाने देखील फटाके फोडण्यासाठी वेळेचे निर्बंध लादले होते.मात्र दिवाळीच्या दोन तीन दिवसात प्रदूषणाचा मीटर 200 च्या पुढे गेला आहे.
एकंदरीत दिवाळी च्या अतिशबाजी नंतर, आणि हवेत जमलेल्या सूक्षम धुळीच्या कणातून, त्यात हवेतील दमटता, प्रदूषणकारी कारखाने ,वाढणारी प्रचंड बे-लगाम वाहतूक त्यात सर्वात मोठी भर टाकणारा बांधकामचा वेग, यामुळे बेफाम आणि सुसाट सुटलेल्या प्रदूषणाचा वेग आवरणे आता कठीण होत असल्याचे दिसुन येत आहे.सीपीसीबी (CPCB ) ने विकसित केलेल्या समीर (Sameer या app) च्या अनुषंगाने आज 24 तासाचा हवेची गुणवत्ता अत्यंत नित्कृष्ट दर्जा असल्याची दर्शवते.
त्यात कळंबोली स्थित प्रदूषण नियंत्रण मंडळाने बसविलेल्या एअर क्वालिटी इंडेक्स (AQI )मशीन यंत्रणाच बंद असल्याने याठिकाणचे प्रदूषणाचे मोजमाप होऊ शकले नाही.चार दिवसांपूर्वी याच मशीनवर प्रदूषणाचा इंडेक्स 300 च्या पुढे दाखविण्यात येत होते.सध्या हि यंत्रणा नादुरुस्त किव्हा एनए असल्याची दाखवत आहे.एमआयडीसी तोंडरे मध्ये तर स्वतः सीबीसीबी मान्य करीत आहे .दि.13 रोजी रात्री 10 वाजुन 5 मिनिटांच्या सुमारास हि गुणवत्ता सरासरी 24 तासात 202 आहे .जी 100 च्या आत पाहिजे.पनवेल शहरासह नवी मुंबई मधील नेरुळ 167, महापे 154,नेरुळ 212,कोपरी पाडा (वाशी) 250,सानपाडा 204,तळोजा एमआयडीसी मधील तोंडरे याठिकाणी बसविलेल्या यंत्रणेत एअर क्वालिटी इंडेक्स 202 दाखविण्यात आला.
ऐन दिवाळीत मोजमाप करणारी यंत्रणा बंद कशी पडते ?
कळंबोली याठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने बसविलेल्या एअर क्वालिटी इंडेक्स (AQI )मशीन यंत्रणाच बंद असल्याने याठिकाणचे प्रदूषणाचे मोजमाप होऊ शकले नाही.