शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

रोजगार हिरावल्याने दिवाळी साजरी केली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:56 AM

पनवेलमधील ओएनजीसी आदिवासी वाडी,  बच्चेकंपनीसाठी पालकांनी केली फटाके खरेदी 

वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : लॉकडाऊनच्या काळात रोजंदारीवरील रोजगार हिरावले. सहा ते सात महिने घरात बसून काढले. अशावेळी दिवाळी तरी कशी साजरी करणार? घरात पुरेसे सामान नसल्याने दिवाळी साजरी करणे टाळल्याची खंत पनवेलमधील ओएनजीसी आदिवासी वाडीतील रहिवासी गणेश नाईक यांनी व्यक्त केली. घरातील लहान मुले फटाके, रोषणाई करण्यासाठी आग्रह करीत होते. त्यांच्याकरिता फटाक्यांचा बॉक्स सोडल्यास इच्छा असूनही दिवाळी साजरी केली नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.  मंगेश व त्यांचे वडील गणेश नाईक हे खेळपट्टी तयार करतात. लॉकडाऊनपूर्वी एका गोदामात दोघेही रोजंदारीवर काम करायचे, मात्र कोरोनामुळे हे काम बंद झाले. इतर वेळेला कार्यकर्त्यांची फौज या ठिकाणी येते. अशावेळी आमच्या मदतीला कोणीच आले नसल्याचे मंगेश नाईक यांनी सांगितले. गरिबांना सर्व दिवस सारखेच, अशा भावना मंगेशने व्यक्त केल्या.

मुलांचा आग्रह मोडवेनाआपली परिस्थिती काय आहे याची जाणीवही त्या लहानग्यांना नसल्याने लहान मुलांच्या आग्रहास्तव फटाक्यांचा एखादा बॉक्स जीवावर उदार होऊन आम्ही खरेदी केला असल्याचे ओएनजीसी आदिवासी वाडीत झोपडीत राहणारे मंगेश नाईक यांनी सांगितले.

मोजकेच फटाके फोडून आनंदमुलांनी केलेल्या आग्रहामुळे मोजकेच फटाके फोडून हा दिवाळी सण साजरा केला. या आनंदात दरवर्षीसारखी मज्जा नव्हती मात्र लहानग्यांच्या आग्रहास्तव पालकांनी त्यांची हौस पूर्ण करण्याचा यातून प्रयत्न केला.

कोरोनामुळे सर्व काही उद्ध्वस्त झालेकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या वर्षी सर्वांनीच एकमेकांकडे जाण्याचे टाळले. या काळात आम्ही तर बेरोजगार झालो आहोतच, पण हा फटका अद्यापही भरून निघाला नाही. सध्याच्या घडीला आमच्यासह वाडीतील अनेक जण बेरोजगार आहेत. हाच दीर्घकाळीन परिणाम आम्हाला भोगावा लागत आहे.दिवाळीत बाहेरच पडता आले नाहीदरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी दिवाळी या वर्षी आम्ही घरातच बसून काढली, असे चिमुरड्या शैलेश नाईकने सांगितले. दरवर्षी प्रमाणे गोडधोड फराळदेखील बनविला गेला नाही. दरवेळी आई- बाबा दिवाळी आली की उत्साहात असतात. यावेळी कोरोनामुळे त्यांनाही काही करता आलेले नाही. त्यांनी आमचा फटाक्यांचा हट्ट पूर्ण केला.