डिएनए चाचणीमुळे आकरा मृतांची ओळख पटली
By निखिल म्हात्रे | Published: November 10, 2023 07:47 PM2023-11-10T19:47:56+5:302023-11-10T19:48:11+5:30
अलिबाग - महाड एम आय डी सी मधील ब्लु जेट कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ११ कामगारांची डिएनए चाचणीच्या ...
अलिबाग- महाड एम आय डी सी मधील ब्लु जेट कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ११ कामगारांची डिएनए चाचणीच्या तपासणीनंतर ओळख पटली असून या ११ कामगारांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लु जेट कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीत ११ कामगारांचा मृत्यू व ७ कामगार जखमी झाले होते. या दुर्घटनेत मृत पावलेल्या सर्व ११ कामगारांची डिएनए चाचणी करण्यात आली होती. या चाचणीच्या तपासणी केल्यानंतर ओळख पटल्यानंतर आज (शुक्रवारी) त्यांचे आकरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यापैकी महाड तालुक्यातील चोचिंदे येथील आदित्य मोरे, खरवली येथील संजय पवार आणि तळीये येथील अक्षय सुतार यांचे पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यापैकी चोचिंदे येथील आदित्य मोरे यांचे वडील यांना कंपनी प्रशासनाकडून दिलेला ३० लाखाचा धनादेश तहसिलदार महेश शितोळे, डिवायएसपी शंकर काळे, आ. भरतशेठ गोगावले, महाड शहर पोलिस ठाणे पो.नि. खोपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे, युवा सेनेचे महाड तालुका प्रमुख रोहीदास( पप्या)अंबावले, इम्रान पठाण आदी उपस्थित होते.
मयताची नाव -
१) अभिमन्यू भीमरोग उराव,
२) जीवन कुमार चौबे ठाकूर,
३) विकास बहुत महंतो,
४) संजय शिवाजी पवार
५) अक्षय बाळाराम सुतार,
६) आदित्य मोरे,
७) शशीकांत दत्तात्रय भूसाणे,
८) सोमनाथ शिवाजी वायदंडे,
९) विशाल रविंद्र कोळी
१०) अस्लम महबूब शेख,
११)सतीश बापू साळुंके.