विद्यार्थ्यांनी धेय्यापासून विचलित होऊ नये- रवींद्र पाटील
By admin | Published: January 12, 2017 06:08 AM2017-01-12T06:08:58+5:302017-01-12T06:08:58+5:30
विद्यार्थ्यांनी कॉलेजला वाहने घेऊन येण्याचे आधी टाळावे, तसेच वाहने आणली तर प्रामुख्याने वाहतुकीचे नियम पाळलेच
नेरळ : विद्यार्थ्यांनी कॉलेजला वाहने घेऊन येण्याचे आधी टाळावे, तसेच वाहने आणली तर प्रामुख्याने वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत. विद्यार्थ्यांचे हे वय आपल्या आयुष्याच्या मोठ्या वळणावर नेणारे असल्याने त्यांनी स्वत: ठरवून घेतलेल्या धेय्यापासून विचलित होऊ नये, असे आवाहन पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी केले.
येथील मातोश्री सुमती टिपणीस कला, वाणिज्य महाविद्यालयात नव्हाळी क्र ीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाला सुरु वात करण्यात आली. पाच दिवसीय महोत्सवात विविध क्र ीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातील मातोश्री सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या नव्हाळी महोत्सवाचे उद्घाटन नेरळचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी पाटील बोलत होते. नेरळ विद्या मंडळाचे कोषाध्यक्ष विवेक पोतदार, मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत जाधव, प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
नव्हाळी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्र मात रंगावली, कथाकथन, अभिनय, नाट्य, गायन, या स्पर्धांसह सर्व प्रकारच्या मैदानी स्पर्धा होणार आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ३००हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. (वार्ताहर)