शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

५० कोटी नको, ५० किल्ले ताब्यात द्या, संवर्धन करून दाखवितो: संभाजीराजे छत्रपती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 6:08 AM

शिवराज्याभिषेक सोहळा: रायगडावर घुमला ‘जय भवानी... जय शिवराय...’चा नारा

सिकंदर अनवारे, लोकमत न्यूज नेटवर्क, महाड :  किल्ले रायगडावर मंगळवारी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला. संपूर्ण देशभरातून लाखो शिवभक्तांनी हजेरी लावत छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. यावेळी युवराज संभाजीराजे यांनी आम्हाला ५० कोटी नकोत तर राज्यातील ५० किल्ले ताब्यात द्या, त्यांचे संवर्धन, रायगड मॉडेल करून दाखवतो, असे आवाहन राज्य सरकारला केले. 

राजसदरेवर त्यांच्यासह  आमदार राेहित पवार, अनिकेत तटकरे, मंगेश चव्हाण यांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला युवराज संभाजीराजे यांनी अभिषेक केला.  तसेच, ३५० सुवर्ण होनांचा अभिषेकही करण्यात आला. २ जूनला तिथीप्रमाणे  राज्य  सरकारकडून  शिवराज्याभिषेक  सोहळा साजरा झाला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी रायगडावर शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी देण्याची घोषणा केली होती.  त्याचा संदर्भ देत संभाजीराजे म्हणाले, ‘रायगडावर आलेले मावळे हे आपली प्रेरणा  असून या मावळ्यांनी उज्ज्वल महाराष्ट्राच्या भविष्याकरिता पुढे आले पाहिजे.  

रात्री उशिरापर्यंत शिवभक्तांची रीघ

गडावर अपेक्षेहून जास्त गर्दी झाल्याने बाहेर पडणे मुश्किल झाले होते. संभाजीराजे यांनी वारंवार आवाहन करूनही मावळे माघारी फिरत नव्हते. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवावे  लागले. रात्री उशिरापर्यत मार्गावर भक्तांची रीघ आणि वाहतुकीची कोंडी कायम होती.

१० हजारांवर शिवभक्त आजारी

रायगडावर शिवराज्याभिषेक साेहळ्यासाठी राज्य शासनाने जय्यत तयारी केली होती. असे असले तरी यंदा वाढत्या तापमानाचा मोठा फटका शिवभक्तांना बसला आहे. गेल्या सहा दिवसांत उष्माघातासह डिहायड्रेशन आणि सर्प, विंचूदंश आदी कारणांमुळे सुमारे १० हजार ९८ जणांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. त्यापैकी एकाचा ह्दयविकाराने मृत्यू झाला तर ३२ जणांवर उपचार सुरू असल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

न्यू पॅलेस प्रांगणात शाही सोहळा

कोल्हापूर : आंब्याच्या डहाळ्यांनी सजलेल्या कमानी, सनई चौघड्यांचे स्वर, प्रादेशिक सेनादलातील वाद्यवृंदाच्या पथकाने भारलेला उत्साह, पोलिस दलाच्या वाद्यवृंदाने दिलेली सलामी आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा शाही थाटात मंगळवारी कोल्हापुरातील न्यू पॅलेसच्या रम्य परिसरात शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा रंगला.

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivrajyabhishekशिवराज्याभिषेकRaigadरायगड