शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

खांडस आरोग्य केंद्रात डॉक्टर गैरहजर

By admin | Published: January 14, 2017 6:54 AM

कर्जत तालुक्यातील आरोग्य सेवा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र पाहायला मिळते. यात अधिक भर म्हणजे अतिदुर्गम

कांता हाबळे / नेरळकर्जत तालुक्यातील आरोग्य सेवा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र पाहायला मिळते. यात अधिक भर म्हणजे अतिदुर्गम आदिवासी भागातील खांडस प्राथमिक आरोग्य केंद्र लोकांना आरोग्य सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. येथील डॉक्टर सतत गैरहजर राहत असून कर्मचारी देखील बिनधास्त आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या रु ग्णांना उपचाराविना परतावे लागत आहे.खांडस प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना आरोग्य केंद्रात राहणे अभिप्राय असून शासनाने कर्मचाऱ्यांसाठी लाखो रु पये खर्च करून प्रशस्त इमारत बांधली आहे. तरी देखील येथे एकही कर्मचारी राहत नाही. यामुळे रात्रीच्या वेळी येणाऱ्या रु ग्णांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यांना उपचारासाठी १२ किमी कशेळे येथे जावे लागते. आलेल्या रु ग्णांना वेळीच उपचार न मिळाल्यामुळे रु ग्ण दगावल्याच्या अनेक घटना देखील येथे घडल्या आहेत. वरिष्ठांकडून येथे राहण्याचे आदेश असून देखील एकही कर्मचारी राहत नसल्याने वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली होत आहे.अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचे वेतन रोखण्यात यावे अशी जिल्हापरिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी खांडस पाथमिक आरोग्य कें द्रात घेतलेल्या सभेतमागणी केली आहे.कर्जत तालुक्यातील बहुतांश भाग आदिवासी अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. आदिवासी भागात शिक्षण, रस्ते ,पाणी आणि आरोग्य या समस्या त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहेत. खांडस प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त असलेल्या डॉक्टर गीता कदम सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांची फार गैरसोय होत असते. तसेच येथे कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी नव्याने वसाहत असून देखील डॉक्टर तसेच एकही कर्मचारी राहत नाही. जिल्हा आणि तालुका वरिष्ठांकडून वारंवार येथे राहण्याचे आदेश देऊन देखील येथील कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. खांडस प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील एक वर्षांपासून डॉक्टर सतत गैरहजर असतात त्यामुळे रु ग्णांची फार हाल होत असतात. एक महिन्यापूर्वी खांडस येथील विमल भोपी (५५) यांना रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना खांडस प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले परंतु दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नसल्याने पुढे कशेळेला हलवण्यात आले, त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्यांना वेळीच डॉक्टरांकडून उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचवता आला असता असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.खांडस प्राथमिक केंद्र हे अतिशय दुर्गम आणि आदिवासी भागात असल्याने येथील नागरिकांना खांडस दवाखाना हा एकच पर्याय आहे. खांडस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ६ उपकेंद्र येत असून ४० पेक्षा अधिक आदिवासी वाड्या या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत. परंतु येथील कर्मचारी नेहमीच गैरहजर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी येथे डॉक्टर तसेच एकही कर्मचारी राहत नाही त्यामुळे नागरिकांना फार हाल सहन करावे लागतात. तसेच हा संपूर्ण आदिवासी भाग असल्याने सर्पदंश आणि साथीचा रोग असलेल्या रु ग्णांची संख्या अधिक असते यासाठी कायमस्वरूपी डॉक्टर देण्याची नागरिकांची मागणी आहे.