डॉक्टरला रु ग्णांच्या नातेवाइकांकडून मारहाण , अलिबागमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 02:15 AM2019-06-27T02:15:25+5:302019-06-27T02:16:16+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत पांडकर यांना रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली.
अलिबाग : जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत पांडकर यांना रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. डॉक्टरांच्या या भूमिकेमुळे जिल्हा सामान्य रु ग्णालयातील रु ग्णांचे मात्र चांगलेच हाल झाले. अलिबाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी महिला २५ जून रोजी दाखल झाली होती. महिलेची प्रसूती झाल्यानंतर टाके घालण्यात आले नव्हते. याबाबत महिलेच्या नातेवाइकांनी डॉ. पांडकर यांना विचारणा केली. त्या वेळी डॉ. पांडकर हे दुसºया महिला रुग्णाच्या शस्त्रक्रियेत व्यस्त होते. दोन तास झाले तरी प्रसूतीपश्चात टाके घातले गेले नाहीत. रु ग्णाला तत्काळ बघितले गेले नाही याचा राग मनात धरून रु ग्णाच्या नातेवाइकांनी डॉ. पांडकर यांना
रुग्णालयातच मारहाण केली. डॉक्टरला मारहाणीनंतर अलिबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या वेळी डॉक्टरांनी एकत्र येत मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जिल्हा रु ग्णालयातील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अजित गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. या घटनेमुळे अलिबागमध्ये खळबळ उडाली आहे.