उत्तम आरोग्याचा संदेश देण्यासाठी डॉक्टर धावले, खारघर शहरात रन फोर हेल्थचे आयोजन
By वैभव गायकर | Published: January 7, 2024 05:29 PM2024-01-07T17:29:12+5:302024-01-07T17:29:58+5:30
पनवेल - उत्तम आरोग्यासाठी मानसिक स्वास्थ्यासह क्षारिरिक स्वास्थही तितकेच महत्वाचे आहे. हाच संदेश देण्यासाठी नवी मुंबई मधील डॉक्टरांच्या हेल्थकॉन ...
पनवेल - उत्तम आरोग्यासाठी मानसिक स्वास्थ्यासह क्षारिरिक स्वास्थही तितकेच महत्वाचे आहे. हाच संदेश देण्यासाठी नवी मुंबई मधील डॉक्टरांच्या हेल्थकॉन या सेवाभावी ग्रुपच्या माध्यमातुन खारघर शहरात रन फ़ॉर हेल्थचे आयोजन दि.7 रोजी केले होते.यावेळी 70 पेक्षा जास्त डॉक्टर 5 ते 10 किमी पर्यंत धावले.
सध्याच्या धकाधकीच्या काळात अनेकांचे आपल्या स्वास्थाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे मधुमेह,रक्तदाब,हृदयाचे आजार बळावले आहेत. उत्तम स्वास्थासाठी किमान दिवसातून एका तास तरी व्यायाम अथवा चालने गरजेचे आहे.हा संदेश देण्यासाठी सर्व डॉक्टरांनी रन फोर हेल्थ या उपक्रमात सहभाग घेतला.सकाळी 6 वाजता खारघर सेंट्रल पार्क याठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.हेल्थकॉनचे देशभरात आठ हजारांपेक्षा जास्त सदस्य आहेत.डॉक्टरांचे आणि त्यांचे कुटुंबियांचे आरोग्याबाबत डॉक्टरांसाठी स्थापन करण्यात आलेले हेल्थकॉन हे विविध उपक्रम राबवत असतो.त्याचाच भाग म्हणुन हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती डॉ प्रवीण गायकवाड यांनी यावेळी दिली.
आजच्या उपक्रमाद्वारे आम्ही सर्व समाजालाच आरोग्याबाबत सजग राहण्यासाठी एकत्र आलो असल्याचे डॉ अनिता बजाज यांनी सांगितले.प्रत्येकानी स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे असे त्या पुढे म्हणाल्या.यावेळी हेल्थकॉनचे डॉ प्रवीण गायकवाड,डॉ आरती गायकवाड,डॉ सोमनाथ मल्लकमीर,डॉ नचिकेत जाधव,डॉ अनिता बजाज,डॉ चेतन सिंघल,डॉ मनीषा मातकर,डॉ वैशाली लोखंडे आदींसह डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकट - डॉ राम घुटे यांनी हेल्थकॉनची स्थापना केली.डॉक्टरांसह त्यांच्या कुटुंबियांचे स्वास्थ योग्य व सुरळीत राहण्यासाठी हेल्थकॉन कार्यरत असते.त्याचाच भाग म्हणुन आम्ही हा उपक्रम राबवला असल्याचे डॉ प्रवीण गायकवाड म्हणाले.नवी मुंबईत हेल्थकॉनचे 202 डॉक्टर्स सदस्य आहेत.