अलिबागमध्ये डॉक्टरांनी घडवले माणुसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 01:05 AM2020-02-20T01:05:44+5:302020-02-20T01:06:12+5:30

विषप्राशन के लेल्याआदिवासी मुलीला जीवदान : आवश्यक साधनसामग्री नसतानाही वाचवले प्राण

Doctor's vision of humanity in Alibaug | अलिबागमध्ये डॉक्टरांनी घडवले माणुसकीचे दर्शन

अलिबागमध्ये डॉक्टरांनी घडवले माणुसकीचे दर्शन

Next

निखिल म्हात्रे

अलिबाग : जिल्हा रुग्णालयाकडे सध्या नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. मात्र याच रुग्णालयात शुक्रवारी विषप्राशन करून अति गंभीर झालेल्या रुग्णाला डॉक्टर राजीव तंबाळे, डॉ. विक्रम पडोळे यांनी जीवदान दिले आहे. रुग्णालयात आवश्यक साधनसामग्रीचा तुटवडा असूनही रुग्णास जीवनदान दिल्याने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांमधील माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा झाले आहे.

पेण तालुक्यातील वरसई गावात राहणाऱ्या १८ वर्षीय अदिवासी युवतीने किरकोळ कारणावरून विषप्राशन केले होते. सुनीता सोनार हिला अचानक उलट्या झाल्याचे तिच्या नातेवाइकांनी तिला उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी सुनीताला तपासताच तिने विषप्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, सुनीताची प्रकृतीचिंताजनक झाली होती. तिच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार होणे गरजेचे होते. जिल्हा रुग्णालयात अपुरी वैद्यकीय सुविधा असल्याने सुनीताला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात सांगण्यात आले होते. मात्र, तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने तिचे कुटुंबीय तिला मुंबई येथे घेऊन जाण्यास तयार होत नव्हते. हा सारा प्रकार अपघात विभागात आपली ड्युटी चोख निभविणाºया डॉ. राजीव तंबाळे व डॉ. विक्रम पडोळे यांना कळाला. सुनीताबाबतची संपूर्ण केसस्टडी करुन तिच्या कुटुंबीयांचे संमतीपत्रक घेऊन तिच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. एक दिवसआड करून तिचे डायलेसिस करण्यात येत होते. तसेच तिला स्पेशल ट्रिटमेंन्ट देण्यात येत होती.
आपुºया वैद्यकीय यंत्रणांचा सामना करीत सुनीताचे प्राण वाचविणे डॉ. राजू आणि डॉ.विक्रम यांच्यासमोर मोठे आव्हान होते. या दोन्ही डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले.
चार दिवसातच सुनीताची प्रकृती सुधारली. डॉक्टरांनी सुरू केलेल्या उपचारांना तिचे शरीर साथ देत होते. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश हि आले. त्यामुळे दोन्हीही डॉक्टर सुनीता आणि तिच्या नातेवाइकांसाठी देवदूत बनले आहेत.

आमच्या मुलीची प्रकृती हि चिंताजनक बनली होती. तिची अवस्था पाहून ती काही दिवसांची सोबती आहे असा अमचा समज होता. मात्र, जिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर आमच्या मदतीसाठी देवासारखे धावून आले. त्यांनी केलेल्या उपचारामुळेच आमच्या मुलीचे प्राण वाचले. तिचा हा पुन:जन्म म्हणायला हरकत नाही. डॉ. राजू व डॉ. विक्रम यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच सुनिताचा जीव वाचला. आम्हाला माणसातच देव दिसला.
- दामा सोनार, सुनिताचे बाबा

२७ जानेवारी रोजी अपघात विभागात आपली ड्युटी निभावत असताना १८ वर्षीय मुलीने विष प्यायल्याने तिला उपचारासाठी घेऊन तिचे नातेवाईक आले होते. त्यावेळी तिची प्रकृ ती गंभीर होती. मात्र, परिस्थीतीने गांजलेल्या तिच्या आईवडीलांसमोर कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे सुनितावर येथेच उपचार करायचे ठरविले. आम्ही केलेल्या उपचाराला यश आले. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत.
- डॉक्टर राजीव तंबाळे, जिल्हा रुग्णालय

Web Title: Doctor's vision of humanity in Alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.