सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड जिल्हा पोलीस दलाचे वर्चस्व

By निखिल म्हात्रे | Published: December 14, 2023 04:18 PM2023-12-14T16:18:55+5:302023-12-14T16:19:19+5:30

सीटीएनएस कार्यप्रणाली मध्येरायगड जिल्हयाने राज्यात पुन्हा एकदा आपली सरशी सिद्ध केली आहे.

Dominance of Raigad District Police Force in CCTNS functioning in alibugh | सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड जिल्हा पोलीस दलाचे वर्चस्व

सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड जिल्हा पोलीस दलाचे वर्चस्व

निखिल म्हात्रे,अलिबाग : सीटीएनएस कार्यप्रणाली मध्येरायगड जिल्हयाने राज्यात पुन्हा एकदा आपली सरशी सिद्ध केली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये पुन्हा एकदा २०१ गुणांपैकी १९६ गुण प्राप्त करून १७.५१ टक्के गुणांसह राज्याच्या गुणांकनात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

दरमहा पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरीचा आढावा घेण्यासाठी अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत राज्यातील सर्व घटकांकडून मासिक कामगिरी अहवाल घेण्यात येतो. सन २०२२ प्रमाणेच २०२३ मध्ये देखील  सीटीएनएस प्रणालीच्या उत्तम कामकाजात सातत्य कायम ठेवत
रायगड पोलीस दलाने दैदीप्यमान कामगिरीची घोडदौड सुरु ठेवली आहे.

सीसीटीएनाएस मार्फत करण्यात येणाऱ्या नियमित कामकाजामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करीत रायगड पोलीस दलाने सन २०२३ मध्ये जुलै व ऑक्टोबर मध्ये प्रथम क्रमांक, फेब्रुवारी, एप्रिल, मे, जुन मध्ये द्वीतीय क्रमांक, जानेवारी, मार्च व सप्टेंबर मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करीत नियमित आपल्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले आहेत.

पोलीस अधीक्षक सोमनाथ धागे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक, कार्यालय येथे स्थापीत सीसीटीएनएस कक्ष व पोलीस ठाणेस नियुक्त प्रशिक्षीत पोलीस अंमलदार यांनी ही प्रशंसनिय कामगिरी केली आहे. याचीच दखल घेत रायगड पोलीस दलास सन २०२३ चे वार्षिक तृतीय क्रमांकाचे पारितोषीक देखील प्राप्त झाले आहे.


रायगड जिल्हयाने पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे, अहवाल यांची सीसीटीएनएस मधील फॉर्मची तत्काळ नोंदणी, सिटीझन पोर्टल, सीसीटीएनएस प्रणालीचा वापर करून करण्यात येणारे गुन्हे प्रकटीकरण, प्रतिबंधक कारवाई यामध्ये विशेष कामकाज करीत यश प्राप्त केले आहे. अटक होणाऱ्या गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात हि प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत आहे. 

पोलीस ठाण्यात अटक होणाऱ्या गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात सदर प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत असुन रायगड जिल्हा पोलीस दलाची ही घोडदौड यापुढेही अशीच सुरु राहील असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले आहे.

रायगड पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या अपार मेहनतीचे हे यश आहे. यामध्ये सातत्य कायम ठेवत यापुढेही रायगड जिल्हा अग्रस्थानी ठेवण्याकरीता प्रयत्नशिल राहू असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

Web Title: Dominance of Raigad District Police Force in CCTNS functioning in alibugh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.