पोलीस भरतीवेळी अमिषाला बळी पडू नका : सोमनाथ घार्गे

By राजेश भोस्तेकर | Published: November 5, 2022 12:42 PM2022-11-05T12:42:10+5:302022-11-05T12:42:52+5:30

पोलीस भरतीत अमिषाला बळी पडून स्वतः चे नुकसान करू नका अशी स्पष्टता जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उमेदवारांना दिली आहे. 

Don't fall victim to Amisha during police recruitment: Somnath Gharge | पोलीस भरतीवेळी अमिषाला बळी पडू नका : सोमनाथ घार्गे

पोलीस भरतीवेळी अमिषाला बळी पडू नका : सोमनाथ घार्गे

Next

अलिबाग : पोलीस दलात होणारी भरती ही पारदर्शक, नियमांना धरून केली जाणार आहे. त्यामुळे भरती होणाऱ्या उमेदवारांनी आपल्या हिमतीवर आणि बुद्धी कौशल्याने पोलीस दलात सामील व्हा. पोलीस भरतीत अमिषाला बळी पडून स्वतः चे नुकसान करू नका अशी स्पष्टता जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उमेदवारांना दिली आहे. 

राज्यात पोलीस विभागात अनेक पदे रिक्त आहेत. पोलीस विभागात रिक्त पदे भरावीत यासाठी शासनामार्फत राज्यात पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अधिकाधिक तरुण तरुणींनी या पोलीस दलात सामील होण्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर २०२२ चे आयोजन अलिबाग पोलीस परेड मैदानावर एक दिवसासाठी आयोजित केले होते. उमेदवाराच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरात जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपस्थित तरुण तरुणींना मार्गदर्शन केले. यावेळी घार्गे यांनी पैसे देऊन अमिषाला बळी पडू नका असे आवाहन केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, गृह उप अधीक्षक जगदीश काकडे, मुरुड पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे, मांडवा पोलीस निरीक्षक राजीव पाटील यावेळी उपस्थित होते.

रायगड पोलीस दलात भरती होणारे उमेदवार हे परजिल्ह्यातील अधिक असतात. त्यामुळे काही वर्षाने पोलीस कर्मचारी हे आपल्या गावी बदली करून जात असतात. त्यामुळे रायगड पोलीस दलात पोलीस कर्मचारी याची रिक्त पदांची कमतरता भासत आहे. यासाठी होणाऱ्या पोलीस भरतीत रायगडातील अधिकाधिक तरुण तरुणींनी सहभाग घेऊन दलात सामील व्हावे अशी इच्छा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मार्गदर्शन करताना बोलून दाखवली.

पोलीस दलात सामील होणाऱ्या तरुण तरुणीला भरतीचे नियम, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा बाबत मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत केले जाणार आहे. लेखी परीक्षेत बेसिक अभ्यासावर भर देणे आवश्यक आहे. मैदानी चाचणीत कशा पद्धतीने उमेदवार याला मार्क मिळू शकतात. याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले गेले. त्यामुळे भरती वेळी उमेदवारांना याचा अधिक लाभ होऊन मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यातील उमेदवार दलात सामील होण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आठ उपविभागीय अधिक्षक विभागात मार्गदर्शन शिबिर आयोजित केले गेले होते. साधारण आठ ते दहा हजार उमेदवार या शिबिरात सहभागी झाले होते.
---
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुले मुली यांनी पोलीस दलात सामील व्हावे, यादृष्टीने मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले आहे. या शिबिरात लेखी परीक्षा, मैदानी चाचणी कशा पद्धतीने असते. याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. भरती प्रक्रिया किती पारदर्शक होणार, याबाबतही सांगितले असून कोणत्याही अमिषाला बळी पडू नका. तरुणांनी आपल्या हिंमतीवर दलात सामील व्हावे लागणार आहे. 
- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड
 

Web Title: Don't fall victim to Amisha during police recruitment: Somnath Gharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.