मोहिलीतील डीपी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:25 AM2017-08-13T03:25:39+5:302017-08-13T03:25:39+5:30

मानिवली ग्रामपंचायत हद्दीतील मोहिली येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील विजेचा डीपी अनेक महिन्यांपासून उघड्या अवस्थेत आहे. हा खुला डीपी धोकादायक असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

The DP in the campaign is dangerous | मोहिलीतील डीपी धोकादायक

मोहिलीतील डीपी धोकादायक

Next

कांता हाबळे ।
नेरळ : मानिवली ग्रामपंचायत हद्दीतील मोहिली येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील विजेचा डीपी अनेक महिन्यांपासून उघड्या अवस्थेत आहे. हा खुला डीपी धोकादायक असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. असे असताना, महावितरण आणि स्थानिक ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांना पडला आहे.
कर्जत तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायत हद्दीत मोहिली येथे पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेसमोर अनेक महिन्यांपासून विजेचा डीपी उघडा आहे आणि त्यामुळे येथे लहान बालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे; परंतु याकडे महावितरणचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे; परंतु या विजेच्या उघड्या डीपीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी या उघड्या डीपीला झाकण बसविण्यात यावे, अशी मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे. तसेच येथे दोनच वर्ग खोल्या असून, या दोन वर्ग खोल्यांमध्ये पाच वर्ग भरवले जात असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोहिली शाळेसमोरील खुल्या डीपीची त्वरित पाहणी करून त्यावर झाकण बसविले जाईल.
- सुशांत थोरात, प्रभारी शाखाधिकारी, नेरळ

खुल्या डीपीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे; परंतु संदर्भात महावितरणकडे लेखी तक्र ार केली नाही, तसेच ग्रामस्थांचेही सहकार्य मिळत नाही, तसेच शाळेसमोरील वाढलेले गवत लवकरच काढण्यात येईल.
- किसन डोहळे, मुख्याध्यापक, मोहिली शाळा

Web Title: The DP in the campaign is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.