रोह्यातील भुयारी ड्रेनेजचा चेंबर खचला; नागरिकांनी व्यक्त केली नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:07 AM2019-07-23T00:07:55+5:302019-07-23T00:08:10+5:30

भुयारी गटार ड्रेनेज योजनेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Drainage chamber in Roha falls; | रोह्यातील भुयारी ड्रेनेजचा चेंबर खचला; नागरिकांनी व्यक्त केली नाराजी

रोह्यातील भुयारी ड्रेनेजचा चेंबर खचला; नागरिकांनी व्यक्त केली नाराजी

Next

रोहा : रोहा नगरपालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या भुयारी गटार ड्रेनेज योजनेअंतर्गत शहरात ठिकठिकाणी फोडलेल्या रस्त्यांमुळे नागरिक मनस्ताप सहन करीत आहेत. ही योजना अद्याप सुरू झालेली नसताना रस्त्यातील भुयारी ड्रेनेजचा चेंबर खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ माजली, तर दुसरीकडे या योजनेच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या कामाच्या दर्जाविषयी शंका असल्याने मागणी करूनही या कामाचे त्रयस्थ तांत्रिक परीक्षण जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी यांच्याकडून असा प्रश्न रोहेकर करीत आहेत. या संस्थेकडून कामाचे थर्ड पार्टी आॅडिट करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.

भुयारी ड्रेनेज योजना सुरू होण्याआधीच रस्त्यावरील चेंबर खचल्याची घटना घडली आहे. श्री धावीर प्रवेशद्वार रस्त्याच्या मध्यभागी नव्याने केलेल्या भुयारी ड्रेनेज योजनेचा चेंबर खचला. आतल्या बाजूला असल्याने या रस्त्यावरून जड वाहने जास्त संख्येने ये-जा करीत नाहीत, कमी वर्दळीच्या असलेल्या रस्त्यावरील हे चेंबर खचल्याचे शहरात खळबळ माजली. अद्याप भुयारी ड्रेनेज योजना सुरूच झालेली नाही. योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एकीकडे योजनेचे काम सुरू असतानाच पाठोपाठ चेंबर खचत असल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. चेंबर खचल्याचे समजताच संबंधित ठेकेदाराने घाईगडबडीत चेंबरची दुरुस्ती केली. रविवार असल्याने अनेक भक्तगण श्री धावीर दर्शनाला जातात, चेंबर खचल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि बहुचर्चित भुयारी योजना पुन्हा चर्चेत आली. याबाबत रोह्याचे मुख्याधिकारी यांना संपर्क होवू शकला नाही.

गावात सुरू असलेल्या सर्व योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत, इतर नगरपालिकांप्रमाणे या कामांचे थर्ड पार्टी आॅडिट रायगड जिल्ह्यातील नामांकित डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी यांच्याकडून पारदर्शक पद्धतीने करून घ्यावे अशी मागणी पालिकेतील बैठकीत केली होती, ते न केल्याने याचे परिणाम आता समोर येत आहेत. - आप्पा देशमुख, निमंत्रक, सिटीझन्स फोरम

मुळात या चेंबरची कामे विटांनी केली आहेत. त्यालाच आक्षेप आहे. ते काम रस्त्यातील असल्याने मजबूत आरसीसीचे करणे आवश्यक होते, पण नागरिकांचे आक्षेप विचारात न घेता भुयारी ड्रेनेज योजना रेटली आहे. या योजनेचे काम निष्कृष्ट असल्याचे या घटनेतून समोर आले. - राजेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते, रोहा

Web Title: Drainage chamber in Roha falls;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.