कारखानदारांकडून सांडपाण्याचा गटारात निचरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 12:24 AM2020-06-24T00:24:06+5:302020-06-24T00:24:14+5:30

सावित्री खाडीला मिळत असल्याने सध्या ही खाडी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे खाडी किनारी असणारी शेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे.

Drainage of sewage from manufacturers | कारखानदारांकडून सांडपाण्याचा गटारात निचरा

कारखानदारांकडून सांडपाण्याचा गटारात निचरा

Next

सिकंदर अनवारे 
दासगाव : महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने पावसाचा फायदा घेत रासायनिक सांडपाणी थेट गटारांमध्ये सोडत आहेत. हे सांडपाणी गटार मार्गाने थेट सावित्री खाडीला मिळत असल्याने सध्या ही खाडी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे खाडी किनारी असणारी शेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे.
गेली तीन महिने करोनामुळे संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन आहे.आशा परस्थितीमध्ये देखील महाड औद्योगिक क्षेत्रातील जवळपास बहुतेक कारखाने हे सुरूच आहेत. गेली पंधरा दिवस पावसाने देखील जोरदार हजेरी लावली आहे.याचाच फायदा घेत महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखानदारांनी रासायनिक सांडपाणी कारखान्यांना लागून असलेल्या सार्वजनिक गतारांमध्ये सोडले आहे. सध्या हे सर्व गटारे हिरवी, पिवळी, लाल झाली आहेत. या सर्व करखंदारांवर या संबंधित असलेल्या कोणत्याच शासकीय खात्याचा वचक राहिलेला दिसून येत नाही. गटार मार्गे सोडले जाणारे हे पाणी थेट सावित्री खाडीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सावित्री खाडीमध्ये दुर्गंधी पसरत असून खाडी किनारी असलेली भातशेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे.
।मणीराम आॅर्गनिकस या कारखान्याचा पाणी गटारामध्ये येत होता. नमुने घेऊन कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात तपासणी सुरू आहे, जे कारखाने गटारामध्ये पाणी सोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
- सागर औटी, उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
।कारवाईकडे दुर्लक्ष : अशा प्रकारे रसायन मिश्रीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखानदारांना आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. याचे कार्यालय देखील याच औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहे. असे असताना देखील कारखानदार पाणी सोडण्याचे हे काम करत आहे. मात्र हे प्रदूषण नियंत्रण मंडळ या कारखानदारांवर कोणतीच कारवाई न करता दुर्लक्ष करत असल्याचे आरोप नागरिक करत असून नाराजी व्यक्त करत आहेत.

Web Title: Drainage of sewage from manufacturers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.