अलिबाग : उन्हाळा आला की आपल्याला डिहायड्रेशनची समस्या सतावते. शरीरात पाणी कमी असेल तर ही समस्या निर्माण होते. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्यावे लागते. अनेकदा डिहायड्रेशनच्या लक्षणांकडे काहीजण दुर्लक्ष करतात. त्यामुळे याचा त्रास वाढतो. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते.
सध्या उष्णतेचे प्रमाण हे फारच वाढत आहे. त्यातून वातावरणात देखील सतत बदल होत आहेत. त्यामुळे आपण याकडे नीट लक्ष देणे फार आवश्यक असते. दररोज किमान ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. याचा अर्थ निदान आठ ते दहा ग्लास तरी आपण रोज पाणी पिणे आवश्यक असते. सध्याचे जीवन हे फारच धकाधकीचे आहे. त्यामुळे आपल्याला दररोज जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. आपल्या शरीराला नीट हायड्रेड ठेवायला हवे. कामाच्या गडबडीत आपल्या शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही. आपल्याला पाणी पिणे जमले नाही तर ताज्या फळांचा रस पिणे महत्त्वाचे असते. जाणून घ्या कारणे -सोडियम, मग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आदी इलेक्ट्रोलाइटसच्या कमतरतेमुळे ही डिहायड्रेशनची समस्या भेडसावू शकते.त्यातून मधुमेहाच्या लक्षणांमुळेही हा त्रास होऊ शकतो जसे की, सतत लघवीला होणे, यात आपल्या शरीरातील साखर वाढली की मग शरीर ही साखर लघवीतून बाहेर टाकते. तेव्हा याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दुर्लक्ष नको महिलांमध्ये -डिहायड्रेशनची समस्या वाढल्यास तोंड कोरडे पडणे, जास्त तहान लागणे, लघवी कमी प्रमाणात होणे किंवा न होणे. जास्त प्रमाणात धाप, लागणे, ताप येणे अशी लक्षणे आढळल्यास याकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये. डिहायड्रेशनची लक्षणे -साधारणपणे जास्त प्रमाणात पिवळी लघवी होणे हे एक प्रामुख्याने दिसणारे लक्षण आहे. जेव्हा लघवी पिवळी होत असेल तर समजावे की डिहायड्रेशनचा त्रास आहे. त्यानंतर श्वासाची दुर्गंधी येणे ही लक्षणे दिसू लागतात. डिहायड्रेशन झाल्यास जास्त प्रमाणात घाम येणे किंवा मग अजिबातच घाम न येणे ही लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे दिसताच यावर तत्काळ उपचार घ्यावेत.