धुण्याच्या पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा

By admin | Published: May 25, 2017 12:22 AM2017-05-25T00:22:03+5:302017-05-25T00:22:03+5:30

तालुक्यातील गोंडघर गावामध्ये नागरिकांना ग्रामपंचायतीमार्फत धुण्यासाठी वापरात येणाऱ्या पाण्याचा पुरवठा पिण्यासाठी होत आहे.

Drinking water supply | धुण्याच्या पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा

धुण्याच्या पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसळा : तालुक्यातील गोंडघर गावामध्ये नागरिकांना ग्रामपंचायतीमार्फत धुण्यासाठी वापरात येणाऱ्या पाण्याचा पुरवठा पिण्यासाठी होत आहे. यामुळे गोंडघर ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास दोन हजार नागरिकांना आपले आरोग्य धोक्यात घालून हे पाणी प्यावे लागत आहे.
नळपाणी पुरवठा योजना गोंडघरमार्फत पाणीपुरवठा करण्यासाठी २० ते २५ वर्षांपूर्वी एक विहीर बांधण्यात आली होती. आजही याच विहिरीतून गोंडघर गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो, परंतु ही विहीर जेथे आहे त्याला लागूनच एक ओढा वाहतो. त्या ओढ्यामध्ये अनेक जण आपली गुरे-ढोरे धुतात, तसेच कपडे धुण्यासाठी याच ओढ्याचा वापर केला जातो. त्यातच या विहिरीला एक भले मोठे भगदाड पडले आहे आणि ते नेमके या ओढ्याला लागूनच आहे. त्यामुळे या ओढ्यातील सर्व अशुद्ध पाणी या भगदाडामार्फत विहिरीत पडते. त्यामुळे विहिरीतील पाणी अशुद्ध होते. पुढे हेच पाणी संपूर्ण गोंडघर गावात पुरविले जाते. जरी साठवण टाकीमध्ये ग्रामपंचायतमार्फत क्लोरीनेशन केले जात असले तरी त्यामधील फक्त जीवाणू मरतात, परंतु गुरे ढोरे, कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारे साबण किंवा पावडरमधील रासायनिक द्रव्ये तशीच्या तशी पिण्याच्या पाण्यात राहतात. या रासायनिक द्रव्ययुक्त पाणी प्याल्याने आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असून, असे पाणी प्याल्याने पचनसंस्थेशी निगडित आजार होतात, अशी माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. विहीर व आसपासच्या परिसरात, तसेच विहिरीलगत असलेल्या ओढ्यामध्ये कचरा, लहान मुलांचे डायपर पडलेले आहेत. जनावरे देखील त्या पाण्यात बसलेली असतात. हेच पाणी ओढ्यातून विहिरीला पडलेल्या भगदाडातून विहिरीत जात आहे.

Web Title: Drinking water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.