- सिकंदर अनवारेदासगाव : महाड औद्योगिक क्षेत्रात आणि लोटे (चिपळूण) औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बॉयलरसाठी कोळसा वापरला जातो. कोळशाची ट्रक, डंपरमधून वाहतूक केली जात असून रायगड जिल्ह्यातून दिघी, रोहा आणि वडखळ या तीन ठिकाणच्या बंदरातून कोळसा भरला जातो. कोळशाची वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त होत असल्याने तो मुंबई-गोवा महामार्गावर पडतो. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. असे असताना पोलीस प्रशासन किंवा आरटीओ यांच्याकडून मात्र कोळसा वाहतुकीवर कारवाई होताना दिसत नाही.महाड औद्योगिक क्षेत्रात तसेच लोटे चिपळूण औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कारखान्यांमध्ये बॉयलरसाठी मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाचा वापर केला जातो. या दोन ठिकाणी जाणारा कोळसा रायगड जिल्ह्यातून रोहा आणि वडखळ येथून जातो. कोळशाची वाहतूक राष्टÑीय महामार्गावरून ट्रक व डंपरमधून केली जाते. मात्र वाहनांमध्ये ओव्हरलोड कोळसा भरला जात असल्याने खड्डे, अवघड वळणावर वाहनातील कोळसा रस्त्यावर पडतो. कोळसा वाहनांच्या वेगामुळे उडत असल्याने त्याचा फ टका मार्गावरून चालणाºया वाहनांना तसेच दुचाकीस्वारांना व पादचाºयांना नेहमी बसतो. त्यामुळे कोळसा वाहतूक करणाºया वाहन चालक व कारचालकांमध्ये वाद होत आहेत. कोळशामुळे अपघातांना निमंत्रण देण्यासारखे असून अनेक मोटारसायकलस्वार या पडलेल्या कोळशावरून घसरून त्यांचे अपघात झाले आहेत.चार दिवसांपूर्वी चिपळूण औद्योगिक क्षेत्र किंवा महाड औद्योगिक क्षेत्रासाठी होणाºया वाहतुकीमधून मोठ्या प्रमाणात दासगाव हद्दीत बारीक कोळसा महामार्गावर एक किलोमीटर अंतरापर्यंत पडला होता. या कोळशावरून एखादी गाडी गेली की याची मोठ्या प्रमाणात धूळ उडत होती, तर मागून येणाºया वाहनांना याचा त्रास सहन करावा लागत होता. अनेक दुचाकी घसरून अपघात झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र या ओव्हरलोड कोळशाच्या वाहतुकीवर महामार्ग वाहतूक शाखा पोलीस अंतर्गत तसेच आरटीओने निर्बंध घालणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात कारवाईही करणे गरजेची आहे. मात्र तसे होत नसल्याने चालकांमधून संताप व्यक्त होत आहे.दिघी, रोहा आणि वडखळपासून महाड औद्योगिक क्षेत्रात तसेच चिपळूण लोटे औद्योगिक क्षेत्रासाठी ओव्हरलोड कोळसा भरून निघालेल्या वाहनांसाठी तीन महामार्ग वाहतूक शाखा पोलीस अनुक्रमे वाकण, महाड आणि कशेडी येथे आहेत. अशा पद्धतीत बिनधास्तपणे वाहतूक करणाºया कोळशाच्या वाहतुकीवर कोणतीच मोठी कारवाई केल्याचे अद्याप दिसून येत नाही. त्यामुळे ओव्हरलोड कोळशाची वाहतूक करणाºयांचे फावले असून ते कोणालाही न जुमानता अशा प्रकारे वाहतूक करताना दिसून येतात. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस महामार्गावर तैनात दिसतात तर आरटीओ पोलीस गस्त घालताना दिसतात. एवढे असताना कोळशाची ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.रात्रीची वाहतूक मोठ्या प्रमाणातया दगडी कोळशाची वाहतूक महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पहाटेच्या वेळी केली जाते. दोन्ही औद्योगिक क्षेत्रात लागणारा हजारो टन कोळसा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ओव्हरलोड नेला जातो. महामार्गावरील वाहतूक शाखा पोलीस एखाद्या अपघाताव्यतिरिक्त रात्रीचे दिसून येत नसले तर या दरम्यान असलेले सर्वच पोलीस ठाण्याची रात्रीची गस्ती नेहमीच सुरू असते. मात्र, त्यांच्या निदर्शनास कोळशाची होणारी ओव्हरलोड वाहतूक कशी येत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या कोळशामुळे चालक त्रस्त; क्षमतेपेक्षा जास्त कोळशाची वाहतूक होत असल्याची नागरिकांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 3:53 AM