पनवेल : गाडीत लाल दिवा ठेवून समाजात वेगळे प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न एका वाहन चालकाच्या चांगलाच अंगलट आला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही पनवेलमध्ये सर्रास गाडीत लाल दिवा बाळगणाऱ्या वाहन चालकाला प्रादेशिक परिवहन विभागाने नोटीस जारी करत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वाहनाची नोंदणी निलंबित करण्याचे पत्र दिले आहे.शहरात एका कारमध्ये (एमएच ४६ बीए ३७५५) अंबर दिवा व महाराष्ट्र शासनाची पाटी ठेवून फिरत असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अंबर दिवा बाळगण्यासंदर्भात नियमावलीत अनेक बदल तर झालेच आहेत, विशेष रविवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आहे. यासंदर्भात पनवेल महापालिकेचे उपायुक्त व पनवेल विधानसभा मतदारसंघ आचारसंहिता प्रमुख जमीर लेंगरेकर यांना तक्र ार प्राप्त झाली होती. या तक्र ारीची दखल घेत त्यांनी त्वरित उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांना यासंदर्भात माहिती दिली. पाटील यांनी संबंधित गाडी मालकाला नोटीस बजावली. मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार तीन महिन्यांसाठी वाहनाची नोंदणी निलंबित का करू नये? यासंदर्भात मालकाकडून खुलासा मागितला आहे.संबंधित गाडीचा मालक निलेश राठोड नामक व्यक्ती आहे. यापूर्वी अशीच घटना खारघर शहरात घडली होती. खासदाराच्या नावाखाली खारघर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना लाल दिव्याचा धाक दाखवणाºया चालकावर खारघर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याच्या हेतूने आम्ही वाहनांची चौकशी करत आहोत. आमच्या निदर्शनास आलेल्या दोषींवर कारवाई करू, अशी प्रतिक्रि या यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.
लाल दिवा बाळगणे चालकाला पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:33 PM