दुष्काळग्रस्त तालुक्यांत उपाययोजना आखणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 12:08 AM2018-10-25T00:08:25+5:302018-10-25T00:08:31+5:30

राज्य सरकारने १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले आहे.

Drought-hit talukas will take action | दुष्काळग्रस्त तालुक्यांत उपाययोजना आखणार

दुष्काळग्रस्त तालुक्यांत उपाययोजना आखणार

Next

अलिबाग : राज्य सरकारने १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील माणगाव, श्रीवर्धन आणि सुधागड या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. सॅटेलाइटद्वारे झालेल्या सर्वेक्षणात या तालुक्यातील भाताचे पीक पिवळे पडल्याचे दिसून आले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने विविध सवलती आणि योजना देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणार आहे.
माणगाव, श्रीवर्धन आणि सुधागड या तीन तालुक्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात ७८ टक्के सरासरीने पाऊस पडला होता. त्यामुळे लोंबीला आलेला भातपीक ऐन हंगामात पिवळे पडल्याचे पाहणीत आढळून आले.
दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाºयांनी माणगाव तालुक्यातील १८, श्रीवर्धन तालुक्यातील ८ आणि सुधागड तालुक्यातील १० गावांमध्ये जाऊन पिकांची पाहणी केली. या तीनही तालुक्यातील भाताच्या पिकात सुमारे २० टक्के घट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या तालुक्यांमध्ये उपाययोजना करण्यात येणार आहेत.
विविध उपाययोजनांमध्ये जमीन महसुलातून सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकºयांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे यासारख्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचा फायदा नक्कीच रायगड जिल्ह्यातील शेतकºयांना होणार आहे.
>अहवाल पाठवण्याच्या सूचना
या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील सर्व तालुक्यांचे महा मदत संगणक प्रणालीद्वारे दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. या तालुक्यांचे मूल्यांकन करून १८० तालुके गेल्या बुधवारी दुष्काळसदृश असल्याचे जाहीर केले होते.
यामध्ये रायगड जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमधील रँडम पद्धतीने १० टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल पाठविण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त व संबंधित जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Drought-hit talukas will take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.