लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने साचारबंदीसह वीकेंड लाॅकडाऊन सुरू केले आहे. या लाॅकडाऊनला मुरुडसह पंचक्रोशीत भागात नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहेत.राज्य सरकारने दिलेल्या नियमाचे काटेकोरपण नियमाचे पालन करत सलग दुसऱ्या दिवशी ही नागरिकांनी घरात बसणे पसंत केले आहे. मात्र, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या, तसेच लॉकडाऊनचे नियम धुडकावणाऱ्या वाहन चालकांवर मुरुड पोलीस ठाणेसह नगरपरिषदतर्फे कारवाई करण्यात आली.या कारवाईकरिता मुरुड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुदाम मनवे, पोलीस नाईक स्वाती कोळी, पोलीस शिपाई गुणवंत जाधव, होमागार्डसह नगरपरिषद कर्मचारी जयेश चोडणेकर उपस्थित होते. मुरुड मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी रोजच्या रोज खरेदी-विक्रीकरिता शेकडो लोक या ठिकाणी येत आसतात. या खरेदीमधून हजारो रुपायांची उलाढाल होत असते. मात्र, शनिवारपासून ही मुख्य बाजारपेठ बंद असल्याने, या ठिकाणाचे रस्ते सुनेसुने पाहावयास मिळत होते. या लाॅकडाऊनमुळे गरीब जनतेला आर्थिकाला सामोरे जावे लागणार आहे.
महाबळेश्वर मार्गावर शुकशुकाटलोकमत न्यूज नेटवर्कपोलादपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असताना कडक नियम लागू करण्यात आले आहेत; मात्र शनिवारी पोलादपूर शहरातील महाबळेश्वर मार्गावर मच्छी विक्रेत्यांकडून व ग्राहकांकडून संचारबंदी व सोशल डिस्टन्सिंग हे कोरोना नियम पायदळी तुडविण्यात आले होते. मात्र, रविवारी कारवाईच्या भीतीपोटी रस्त्यावर मात्र सकाळपासून शुकशुकाट पाहावयास मिळाला.१५ एप्रिलपासून जीवनावश्यक साहित्यासह मेडिकल वगळता इतर दुकाने आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले, तर शनिवारी व रविवारी मेडिकल वगळता संपूर्ण दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, महिन्यातील तिसऱ्या शनिवारी मेडिकलसह मच्छी विक्रते, इतर व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडली होती. मच्छी व सुकी मासळी घेण्यासाठी ग्राहकांनीसुद्धा गर्दी केली असल्याने अनेक नियम पायदळी तुडविल्याचे चित्र दिसून आले. एकीकडे कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनसह कडक अंमलबाजवणी करण्यात येत असल्याने ती सर्वसामान्य नागरिक, विक्रेते पायदळी तुडवत आहेत. रविवारी कडक कारवाई होणार असल्याने अनेक नागरिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.