नौदलाच्या ब्रेकवॉटर जेट्टीमुळे मोरा बंदर गाळाच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 02:10 AM2018-08-16T02:10:57+5:302018-08-16T02:15:22+5:30

मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी वाहतूक सध्या गाळात अडकली आहे. नौदलाची ब्रेकवाटर जेट्टी गाळासाठी कारणीभूत ठरत आहे.

 Due to breakwater jetty, Mora Bandar silt | नौदलाच्या ब्रेकवॉटर जेट्टीमुळे मोरा बंदर गाळाच्या विळख्यात

नौदलाच्या ब्रेकवॉटर जेट्टीमुळे मोरा बंदर गाळाच्या विळख्यात

googlenewsNext

- मधुकर ठाकूर
उरण : मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी वाहतूक सध्या गाळात अडकली आहे. नौदलाची ब्रेकवाटर जेट्टी गाळासाठी कारणीभूत ठरत आहे. मात्र, त्याबाबत अद्याप तरी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे बंदरातील गाळाची समस्या गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपये खर्ची घालूनही अद्याप सुटली नसल्याने प्रवासी वाहतूक समुद्राच्या ओहटी दरम्यान महिन्यातून काही तास बंद ठेवण्याची पाळी येते. यामुळे खंडित होणाऱ्या प्रवासी सेवेमुळे हजारो प्रवाशांवर ताटकळत राहण्याची पाळी येते.
मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास मुंबईशी जोडणारा अत्यंत जलद मार्ग आहे. स्वातंत्र्यापासूनच या सागरी मार्गावरून प्रवासी वाहतूक केली जात आहे. नव्याने सुरू झालेल्या स्पीड बोट सेवेमुळे अवघ्या ३० मिनिटांत तर जुन्या प्रवासी लॉचने ५५ ते ६० मिनिटांत मुंबईला पोहोचणे सहज शक्य होत आहे. मागील दहा-बारा वर्षांपूर्वी या सागरी मार्गावरून वर्षाकाठी सुमारे बारा लाख प्रवासी प्रवास करीत होते. कालांतराने मुंबईत ये-जे करण्यासाठी इतर वाहतुकीची साधने उपलब्ध झाल्यानंतरही सागरी मार्गावरील प्रवासी संख्येत फारशी घट झाली नव्हती. उलट समुद्राच्या भरतीच्या वेळी बंदराच्या वरच्या पकटीपर्यंत प्रवासी लॉचेस येत होत्या. त्यानंतर परिसरात औद्योगिकीकरणाची लाट आली आणि पूर्वी न भेडसाविणाºया समस्या नागरिकांना बेजार करू लागल्या. भेडसाविणाºया अनेक समस्यांपैकी मोरा बंदरातील गाळाची समस्या एक होय.
औद्योगिकीकरणामुळे समुद्रात झालेल्या प्रचंड भरावामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत चालली आहे. जेएनपीटी आणि जेएनपीटी अंतर्गत उभारण्यात ओलल्या इतर बंदरांच्या उभारणीसाठीही मोठ्या प्रमाणात समुद्रात दगड-मातीचा भराव करण्यात आला आहे. त्याचा परिणाम जेएनपीटी बंदरापासून थेट मोरा बंदरानजीक असलेल्या नौदलाच्या जेट्टीपर्यंतचा सागरी किनारा प्रचंड गाळाने भरू लागला आहे. गाळ साचण्याला सर्वाधिक कारणीभूत ठरू लागली आहे ती नौदलाची ब्रेकवॉटर जेट्टी. किनाºयापासून साधारणता दीड किमी अंतर लांबीची नौदलाची ब्रेकवॉटर जेट्टी आहे. किनाºयापासुनचे सुमारे १५० मीटर लांबीचे अंतर सोडले तर पुढील संपूर्ण ब्रेकवॉटर जेट्टी मोठमोठे दगड, ब्लॉक, माती आदी भराव टाकून बनविण्यात आली आहे. बे्रकवॉटर जेट्टी पिल्लरवर नसल्याने समुद्राच्या प्रवाहामुळे आलेला गाळ बंदरात अडकून साचला जातो. तो अगदी मोरा बंदर, बोरी, पाणजे, जेएनपीटी बंदरापर्यंत यासाठी नौदलाची अत्यंत जुनाट झालेली बे्रकवॉटर जेट्टी नव्याने पिल्लरवर बांधण्यात आल्यास मोरा बंदरातील साचणाºया गाळाची समस्या कायमस्वरूपी दूर होईल, असा विश्वास जाणकारांकडून अनेकदा व्यक्त केला आहे. त्यासाठी नागरिकांकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. केंद्र सरकाच्या अखत्यारित असलेल्या हा प्रश्न खासदार, लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून सोडविण्याची अपेक्षा उरणवासीयांची आहे. त्यासाठी उरणकरांनी निवडून येणाºया मागील अनेक खासदारांनाही गाºहाणे घातले आहे. मात्र, उरणवासीयांच्या महत्त्वाच्या गाळाच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींनीही सातत्याने दुर्लक्षच चालविले आहे. त्यामुळे उरणकरांच्या नशिबी गाळाची समस्या कायम राहिली आहे.

मोरा बंदरातील गाळ काढण्यासाठी प्रत्येक दोन-चार वर्षांआड शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, त्यानंतरही मोराबंदर गाळाने भरण्याचे थांबत नाही. गाळाच्या समस्येमुळे ओहटीच्या वेळी मोरा बंदरात प्रवासी लाँचेस लागत नाहीत. त्यामुळे महिन्यातील काही दिवसांतील काही तास प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याची नामुश्कीची पाळी वाहतूकदारांवर येऊन ठेपते. गाळाच्या समस्येमुळे प्रवासी वाहतूक बंद करावी लागत असल्याने दररोज प्रवास करणाºया हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यासाठी मोरा बंदरातील गाळाची समस्या दूर करण्यासाठी उरण नौदलाची ब्रेकवॉटर जेट्टी नव्याने पिल्लरवर उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Web Title:  Due to breakwater jetty, Mora Bandar silt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.