मातीच्या बंधाऱ्यामुळे माळरानावरील शेती बहरली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 01:13 AM2018-08-22T01:13:59+5:302018-08-22T01:14:14+5:30
‘जलयुक्त शिवार’चे काम : शेतकऱ्यांना दिलासा; दुरुस्तीनंतर घातला दगडी बांध
कर्जत : बेडीसगावमध्ये माळरानावर असलेल्या मातीच्या बंधाºयांची दुरु स्ती कृषी विभागाने ‘जलयुक्त शिवार’ अभियानात केली आहे. गेले काही दिवस पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे शेतकरी सर्वत्र धास्तावलेले असताना बेडीसगावमधील माळरानावर असलेले मातीचे बंधारे पाण्याने भरलेले आहेत. बंधाºयामुळे शेतीला पाणी उपलब्ध झाले आहे.
कर्जत तालुक्यातील बेडीसगावमध्ये ‘जलयुक्त शिवार’ अभियानात जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्यात बेडीसगावच्या मागे असलेल्या डोंगरावरील माळरानावर असलेल्या बंधाºयांची दुरु स्ती काही दिवसांपूर्वी करण्यात आली. २० वर्षांपूर्वी कृषी विभागाने खोदलेल्या मातीच्या बंधाºयांचा फायदा शेतकºयांना उन्हाळ्यात शेती करण्यासाठी व्हायचा. मात्र, २००५ पासून ते सर्व बंधारे मातीने भरून गेले होते. त्यामुळे प्रामुख्याने शेतकºयांना पाणी कमी पडत असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत होते. कृषी विभागाने ‘जलयुक्त शिवार’ अभियानात बेडीसगावचा समावेश झाल्यानंतर तेथील चार मातीचे बंधारे यांची दुरु स्ती करण्याचा निर्णय घेतला.
मे २०१८ मध्ये चारही मातीच्या बंधाºयातील गाळ काढण्यात आल्याने खोली वाढली आहे. याशिवाय पाणी वाहून जाऊ नये, यासाठी दगडी बांध घालण्यात आले. या सर्व दुरु स्तीच्या कामांमुळे मातीचे बंधारे काठोकाठ भरले आहेत. पाणी मुबलक साठल्याने ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा जलसंधारणाचा उद्देश सफल झाल्याची भावना शेतकºयांत आहे.
गावा सभोवताली आॅक्सिजन निर्माण करणाºया तुळशीची शेती केली जाते. पावसाळ्यात काळी आणि सफेद तुळशीची झाडे लावली जातात. यंदा त्या झाडांना पावसाळ्यात पाणी कमी पडत होते. मात्र, बंधाºयाच्या पाण्यामुळे तुळशीची रोपे पुन्हा बहरली.
- मंगळ दरवडा,
स्थानिक शेतकरी