ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव
By admin | Published: December 3, 2015 01:29 AM2015-12-03T01:29:46+5:302015-12-03T01:29:46+5:30
अवकाळी पाऊस सर्वत्र पडल्याने महाराष्ट्र व अनेक राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांमधील भाजीपाल्याला सुद्धा बसलेला दिसत आहे.
कार्लेखिंड : अवकाळी पाऊस सर्वत्र पडल्याने महाराष्ट्र व अनेक राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांमधील भाजीपाल्याला सुद्धा बसलेला दिसत आहे.
अलिबाग तालुक्यात या हंगामात विविध प्रकारच्या भाज्या व कडधान्ये यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यावर्षी रोपांची लागवड आणि अवकाळी पावसाला सुरुवात यामुळे या तालुक्यातील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर तुडतुडा व कीड या रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. भाजीच्या पानांवर छोटे छोटे छिद्र पडलेले दिसत आहे. लागवड करतेवेळीच जर रोपांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू शकते असे अलिबाग तालुका कृषी अधिक ारी प्रधान यांनी सांगितले.
सध्या ढगाळ व दमट वातावरण असल्यामुळे कीटकांना पोषक वातावरण निर्माण होते. यामुळे कीड, तुडतुडा व बुरशीसारखे रोग जास्त होण्याची शक्यता असते, असे प्रधान यांनी सांगितले. (वार्ताहर)