मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 01:46 AM2018-06-25T01:46:48+5:302018-06-25T01:47:03+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे.
दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र पावसामुळे महाड तालुक्यातील केंबुर्ली गावातील मानीमध्ये डोंगराच्या अर्धवट झालेल्या खोदकामामुळे डोंगराचा भाग खचू लागला आहे. शनिवारी मध्यरात्री अचानक मातीच्या ढिगारा मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावरुन येऊन कोसळल्याने वाहतूक मंदावली होती. दरड कोसळल्याने चालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसºया टप्प्याच्या कामाला जलद गतीने सुरुवात झाली आहे. खोदकाम, मोºया, मातीचे भराव ही कामे तेजीत सुरु करण्यात आलेली आहेत. कामाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली यामुळे ठिकठिकाणी दुसºया टप्प्याचे काम ठेकेदार कंपनीला बंद करावे लागले. सुरुवातीच्या कामामध्ये ठेकेदार कंपनीकडून महाड तालुका हद्दीत राष्ट्रीय माहमार्गालगत चार ठिकाणी वळणावरचे डोंगर फोडण्याचे काम सुरु आहे. यापैकी केंबुर्ली गाव हद्दीत असलेल्या मानी या ठिकाणी अशाच प्रकारे चौपदरीसाठी डोंगर फोडण्याच्या कामाला पावसामुळे थांबवण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत हे काम अर्धवट राहिल्याने याठिकाणी महामार्गालगत असलेल्या या सरळच डोंगर भागाचा सततच्या लागणाºया पावसामुळे काही भाग पोकळ असून सरळ सरळ मातीचा ढीग मुंबई-गोवा महामार्गावरच कोसळू लागला आहे. शनिवारी मध्यरात्री अचानक या भागात एक मातीचा मोठा ढिगारा येऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरच कोसळला. रात्रीची वेळ आणि अंधार या ढिगाºयामुळे या मार्गावरुन जाणाºया-येणाºया वाहनांना धोकादायक स्थिती निर्माण करुन बसला होता.
या अगोदर अशाच प्रकारे दोन वेळा महामार्गावर मातीचे ढिगारे येऊन कोसळले होते. या ठिकाणचे काम अर्धवट राहिल्याने ही परिस्थितीत निर्माण झाली आहे. पावसामुळे ठेकेदार कंपनीला पुढचे काम करणे अवघड आणि अडचणीचे ठरले आहे. तीन वेळा या ठिकाणी या पावसामध्ये मातीचे ढिगारे आणि मोठमोठ्या दगडी मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावर येऊन कोसळल्या असल्या तरी यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी एक वेळा या ठिकाणाहून परिसरात वीज पुरवठा करणारे विजेचे खांब कोसळून जवळपास २४ तास या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
सध्या लागणाºया पावसामुळे केंबुर्ली गाव हद्दीतील यावळण भागातील डोंगराची माती खाली महामार्गावर येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जरी आलेल्या मातीच्या ढिगाºयामुळे कोणते नुकसान झाले नसले तरी अशाच प्रकारे पुढे अचानक माती खाली महामार्गावर आली तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सद्यस्थितीत या ठिकाणी ठेकेदार कंपनीकडून रस्त्यालगत सुरक्षा म्हणून बॅरिकेट्स लावण्यात आले असले तरी हे कुचकामी ठरत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत याठिकाणाचे डोंगर फोडण्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या मुंबई-गोवा महामार्गाची सुरक्षा धोक्यातच आली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याची खबरदारी घेत तात्पुरत्या स्वरुपात का होईना काहीन काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.