दासगाव - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणात महाड तालुक्यातील केंबुर्ली गावालगत असलेला वीज खांब शनिवारी कोसळल्याने परिसरातील आठ गावे आणि ३० वाड्यातील ४ हजार वीजग्राहकांना अंधारात बसावे लागले.महामार्गाच्या खोदकामामुळे महावितरणचे विजेचे तीन खांब कोसळण्याच्या स्थितीत होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’च्या ३ जूनच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. मात्र त्यानंतरही महावितरण आणि ठेकेदार कंपनीने कोणतेच पाऊल न उचलल्यामुळे शनिवारी एक वीजखांब कोसळला.मुंबई - गोवा राष्टÑीय महामार्गाच्या दुसºया टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मोºया, भराव आणि ठिकठिकाणी वळणातील डोंगर फोडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.महाड तालुक्यातील केंबुर्ली गावहद्दीत नदीकिनारी असलेल्या महामार्गालगत वळणावर डोंगर फोडून रुंदीकरणाचे काम उन्हाळ्यामध्ये सुरू होते. खोदकाम करतेवेळी ठेकेदारांनी चार वीज खांबांलगतच खोदकाम केले होते. त्यामुळे पावसाळ्यात खांब कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.पाऊस सुरू झाल्याने खोदकाम सध्या अपूर्णावस्थेतच राहिले. वीजखांब कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरणच्या कर्मचाºयांनी त्या ठिकाणची पाहणी केली आणि ठेकेदार कंपनीला खांब दुरुस्तीचे पत्र दिले होते.मात्र वीज खांब दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने शनिवारी रात्री मुसळधार पावसामध्ये मातीसोबत एक विजेचा खांब खाली कोसळला आणि यावर आधारित वहूर कार्यालयांतर्गत सर्व गावांना रात्रभर अंधारात रहावे लागले.केंबुर्ली मानीतील या महावितरणच्या वीज पोलवरून वहूर कार्यालयांतर्गत दासगाव, वहूर, केंबुर्ली, वीर, टोळ, सापे, दाभोळ आणि कोकरे या गावासोबत अन्य ३० वाड्यांमधील जवळपास ४ हजार ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. मात्र पोल कोसळल्यानंतर ही सर्व गावे अंधारात गेली. आठ तासानंतर तात्पुरता वीजपुरवठा या गावांना गोरेगाव विभागामार्फत करण्यात आला आहे. मात्र तो देखील ओव्हरलोड झाला तर कधीही ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.माती खाली आल्यानंतर त्या ठिकाणी सध्या पूर्णपणे कातळी खडकाळ सरपटी भाग शिल्लक राहिला आहे. या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीत काम करणे कठीण झाले आहे.महावितरण अधिकाºयांच्या ठेकेदारांकडे फेºयागेल्या वर्षी पावसाळ्यात अशाच प्रकारे छोटी-मोठी कामे निघाल्याने गावे, वाड्या ८-१० तास अंधारात रहायच्या. मात्र त्यावेळी चौपदरीकरणाचे काम सुरू नव्हते. महामार्गालगत असलेले विजेचे खांब सुरक्षित जागी हलविण्याची जबाबदारी चौपदरीकरणाच्या ठेकेदार कंपनीकडे आहे. मात्र त्यासाठी महावितरणचे सहकार्य अपेक्षित आहे. सध्या महावितरणच्या अधिकाºयांना वीज खांबाच्या दुरुस्तीसाठी ठेकेदार कंपनीच्या दारात फेºया माराव्या लागत आहेत. पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून या चार खांबांच्या दुरुस्तीचे पत्र ठेकेदार कंपनीला देण्यात आले होते. मात्र त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.मुंबई - गोवा महामार्ग बंद होण्याच्या मार्गावरपावसाचा जोर वाढल्याने कें बुर्ली गाव हद्दीतील वळणावरचे खोदकाम अपूर्णच राहिले आहे. डोंगर भागातील खोदकामामुळे चार दिवसांपूर्वी मातीचा मोठा ढिगारा महामार्गावर येवून कोसळला. पाठोपाठ, शनिवारी रात्री मातीसोबत विजेचा खांब कोसळला. त्याच परिसरात डोंगराळ भाग पोकळ झाला असून तो कधीही कोसळण्याच्या स्थितीत त्यामुळे मुंबई - गोवा राष्टÑीय महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. दोन दिवसात काम करून देण्याचे आश्वासन एल अँड टी या चौपदरीकरणाच्या ठेकेदार कंपनीने दिले आहे.- एस. आर. खोराटे, सहाय्यक अभियंता महावितरण, महाड
वीज खांब कोसळल्याने ८ गावे, ३० वाड्या अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 4:07 AM