कोरोनामुळे बँकिंग व्यवसायामध्ये ठेव संकलन, कर्जवाटपावर परिणाम - प्रदीप नाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 12:31 AM2020-07-08T00:31:04+5:302020-07-08T00:31:36+5:30

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांच्या वाढिदवसाचे औचित्य साधून बँकेमध्ये मंगळवारी ट्रेझरी विभागाचे उद्घाटन बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्या हस्ते झाले.

due to Corona deposit collection in banking business, impact on loan disbursement - Pradip Naik | कोरोनामुळे बँकिंग व्यवसायामध्ये ठेव संकलन, कर्जवाटपावर परिणाम - प्रदीप नाईक

कोरोनामुळे बँकिंग व्यवसायामध्ये ठेव संकलन, कर्जवाटपावर परिणाम - प्रदीप नाईक

Next

अलिबाग : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये आर्थिक व्यवस्थेची घडी पूर्णपणे बिघडत असताना बँकिंग व्यवसायामध्ये ठेव संकलन, कर्जवाटप आणि कर्जवसुली यावर त्याचे दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. यामुळे बँकेने पारंपारिक व्यवसायाच्या पलीकडे जाऊन बँकिंग व्यवसायामध्ये विविधता आणणे ही काळाची गरज आहे. तसेच आधुनिक व्यवसायाकडे देखील सकारात्मक नजरेने पाहणे आणि त्या दृष्टीकोनातून तयारी करणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी केले.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांच्या वाढिदवसाचे औचित्य साधून बँकेमध्ये मंगळवारी ट्रेझरी विभागाचे उद्घाटन बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रदीप नाईक बोलत होते. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकित्रत व्यवसाय हा ३५०० कोटींपेक्षा अधिक असून बँक आजमितीला १५०० कोटी रु पयांची गुंतवणूक करते, या गुंतवणुकीच्या नफ्यातून बँक सहकारामधील इतर संस्था तसेच बँकेच्या ठेवीदारांना आकर्षक व्याजदर देऊ शकते, त्यामुळे ट्रेझरी विभागाची व्यापकता मोठ्या प्रमाणावर असून रायगड जिल्हा सहकारी बँकेसमवेत त्याचा फायदा सहकार क्षेत्रातील संस्थाना होणार आहे असेही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी आवर्जून सांगितले. ट्रेझरी विभागामुळे व्यवहारामध्ये अधिक नफा क्षमता तसेच पारदर्शकता येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर वाघमोडे, बँकेचे उपसरव्यवस्थापक मंदार वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते.

‘संकल्पना सादर करावी’
बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आणि नेतृत्वामुळे संचालक मंडळ यांना एकत्रित निर्णय घेताना आत्मविश्वास अधिक मिळतो, असे मत व्यक्त केले, तसेच बँकेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने अधिक गतिमान, तसेच आधुनिक पर्याय निर्माण करण्यासाठी अभिनव संकल्पना संचालक मंडळास सादर कराव्यात, यासाठी आवाहनही केले.

Web Title: due to Corona deposit collection in banking business, impact on loan disbursement - Pradip Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.