शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

इंजिन घसरल्याने माथेरानची राणी रात्रभर नॅरोगेजवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 5:44 AM

सकाळची एक फेरी रद्द; माथेरान - नेरळ मिनीट्रेन हलली १६ तासांनंतर

कर्जत : माथेरानचा पर्यटन हंगाम लवकरच सुरू होत असून, पर्यटन आणि नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन हे जुळलेले समीकरण मिनीट्रेनच्या इंजिनात सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे अडचणीत येत आहे. शनिवार, २० एप्रिल रोजी माथेरान येथून ५१ पर्यटक प्रवाशांना घेऊन निघालेली मिनीट्रेन बोगद्याजवळ आली असता, त्या गाडीचे इंजिन रुळावरून खाली घसरले. रुळावरून खाली घसरलेले इंजिन उचलायला तब्बल १६ तास लागल्याने मिनीट्रेन रात्रभर माथेरानच्या डोंगरात उभी होती. दरम्यान, सायंकाळी पावणेचार वाजता रुळावरून इंजिन घसरलेली गाडी दुसºया दिवशी सकाळी सव्वानऊ वाजता तेथून हलली आणि ११.३० वाजता नेरळ रेल्वे स्थानकात पोहोचली. दरम्यान, नेरळ येथून माथेरानला जाणाºया मिनीट्रेनची पहिली फेरी रद्द करण्यात आली.माथेरान येथून ५१ पर्यटक प्रवाशांना घेऊन एनडीएम १-४०५ हे इंजिन घेऊन निघालेली माथेरान-नेरळ-माथेरान ही फेरी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी माथेरान स्थानकातून निघाली. दुपारी पावणेचार वाजता ही गाडी एनएम १०८ येथे आली असता, इंजिन रुळावरून खाली घसरल्याने गाडी थांबली. त्यामुळे पर्यटकांचे हाल होत असल्याने शेवटी सर्व ५१ प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी तीन किलोमीटर अंतर चालत घाटरस्त्यावर आणून टॅक्सी पकडून दिली. टॅक्सीने सर्व प्रवासी नेरळ येथे रेल्वे स्थानकात पोहचले.मात्र, रुळावरून खाली घसरलेले इंजिन पुन्हा रुळावर ठेवण्यासाठी नेरळ लोको येथील कर्मचारी वर्ग पोहचला; परंतु लोकोमधील तंत्रज्ञ यांना इंजिन रुळावर ठेवण्यात अडचणी येत होत्या. दुपारी पावणेचार वाजता रुळावरून खाली घसरलेले इंजिन रात्री उशिरापर्यंत उचलता आले नाही. त्यामुळे गाडीवर असलेले कर्मचारी, टीसी, गार्ड हे सर्व कर्मचारी रात्रभर थांबून होते. सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी एनएम १०८ येथे अडकून पडलेली मिनीट्रेन पुन्हा पुढील प्रवास करण्यास तयार झाली आणि नेरळकरिता रवाना झाली. मात्र, नेरळ-माथेरान -नेरळ हा एकच मार्ग असल्याने नेरळ येथून सकाळी माथेरानकरिता सोडली जाणारी पहिली गाडी रद्द करण्यात आली. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी नेरळ स्थानकात होती. त्यानंतर, सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी नेरळ येथून माथेरानकरिता निघालेली पहिली गाडी पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाली होती.रडगाणे संपणार कधी?माथेरान राणीच्या इतिहासात प्रथमच गाडी दुरु स्तीच्या कामासाठी थांबल्यानंतर १६ तास नॅरोगेजवर थांबण्याची ही पहिलीच वेळ आहे. एक संपूर्ण रात्र कर्मचारी त्या ठिकाणी जागून थांबले होते. त्यानंतर, १६ तासांनी तेथून निघाले. त्या काळात त्यांचा माथेरान स्थानक ते नेरळ स्थानक हा प्रवास २० तासांहून अधिक वेळेचा होता. नेरळ -माथेरान-नेरळ ट्रेनचा पर्यटन हंगाम सुरू होत असताना हे रडगाणे अडचणी निर्माण करणारे आहे, अशी भावना पर्यटकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Matheranमाथेरान