सिकंदर अनवारे दागसाव : महाड तालुक्यातील सावित्री खाडीपट्टा विभागात गेली अनेक वषे पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून रेती उत्खनन सुरू आहे, त्यामुळे खाडीपात्राला धोका निर्माण झाला आहे. किनाऱ्यालगतची वनसंपदा नष्ट होत आहे. याशिवाय सावित्री खाडीच्या किनाºयांवर अनधिकृत जेटी आणि भराव केला जात आहे. यामुळे खाडीपात्र अरुंद होऊन भविष्यात केरळ सारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सावित्री खाडीमध्ये महाड औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी आल्यानंतर बहुतांश शेतकºयांनी शेती सोडून दिली. पारंपरिक पद्धतीने हातपाटीद्वारे वाळू उत्खननातून पैसे मिळू लागल्याने अनेकांच्या नजरा सावित्री खाडीकडे वळल्या. कालांतराने यंत्राद्वारे वाळू उत्खनन होऊ लागले. या यंत्राने पर्यावरणाचा धोका असताना वाळू उत्खनन सुरूच आहे. स्थानिकांनी आपल्या जागा रेतीउपशाकरिता आणि साठ्याकरिता दिल्या आहेत. वाळूतून मिळणाºया पैशांच्या हव्यासापोटी पर्यावरणाचा सर्रास ºहास केला जात आहे. काही ठिकाणी खारफुटीची कत्तल करून, प्लॉट तयार करण्यात आले आहेत. याबाबत अनेक तक्र ारी होऊन संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. शिवाय, याच प्लॉटवर रेतीसाठा आणि उपशाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानग्या दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे.महाड तालुक्यातील सव, रावढळ, तुडील, जुई, म्हाप्रळ, कुंबळे, वराठी, या गावांबरोबरच दासगाव, टोळ, सापे, दाभोळ, कोकरे ही गावे खाडीलगत आहेत. दासगाव, वराठी, सापे, टोळ, कोकरे, दाभोळ, ओवळे या गावांच्या परिसरात रेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असून, यांत्रिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू आहे. उत्खनन होणारी वाळूसाठ्याकरिता आणि होड्या लावण्याकरिता प्लॉटधारकांनी थेट नदीतच बांधकामे केली आहेत. नदीपात्रात भराव करून पक्के बांधकाम करून जेटीची कामे केली जात आहेत.जिल्हा प्रशासनाने देण्यात आलेल्या परवानग्यांमध्ये मौजे कोकरे तर्फे गोवेले, मोजे दाभोळ, मौजे सापे तर्फे गोवेले, मौजे ओवळे, या भागातील प्लॉट हे सी.आर.झेड. प्रमाणे संरक्षित आहेत. यातील काही गावांतील प्लॉट हे कांदळवनामध्ये येतात. न्यायालयाच्या आदेशानुसार, शासनाने कांदळवन क्षेत्रातील बांधकामांवर पूर्णत: बंदी घालणे आदी नियमावली देण्यात आली आहे, असे असतानाही मौजे कोकरे तर्फे गोवेले, मौजे दाभोळ, मौजे सापे तर्फे गोवेले, मौजे ओवळे, या गावांतून या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनच कांदळवन क्षेत्रात रेतीसाठ्यास परवानगीमहाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात ज्या ठिकाणी रेतीसाठ्यास परवानगी देण्यात आली आहे, ते प्लॉट कांदळवन क्षेत्रात येतात, तशा प्रकारचा उल्लेख नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाने जमीन वापर दाखल्यावर केला आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाने याच प्लॉटवर रेतीसाठ्यास परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्लॉटवर वाळूच्या माध्यमातून निघणारा रेजग्याचा भराव करण्यात आला आहे. सावित्री खाडीत हा भराव करून जेटीचे पक्के बांधकाम देखील करण्यात आले आहे. सावित्रीच्या दोन्ही बाजूने हा प्रकार सुरू असल्याने खाडीचे अतोनात नुकसान होत आहे. यापूर्वी रासायनिक पाण्याने खाडीचे नुकसान झाले आणि आता वाळूउपशाकरिता कृत्रिम उपाय पर्यावरणास आणि खाडीकरिता धोकादायक बनले आहेत.केरळसारखी पूरस्थिती निर्माण होण्याचा धोकाकेरळमध्ये आलेल्या पुराने संपूर्ण देश हादरून गेला. या निसर्गाच्या प्रकोपाला मानवच जबाबदार असून, नदी-खाडीकिनारी होणारे बेसुमार उत्खनन कारणीभूत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात. अशीच परिस्थिती महाडमध्ये उद्भवण्याची शक्यता या वेळी व्यक्त करण्यात येत आहे.खाडीमध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामांची आणि कांदळवन नुकसानाची पाहणी केली जाईल, त्यानुसार कारवाईही केली जाईल.-विठ्ठल इनामदार,प्रांताधिकारी, महाड
भरावामुळे खाडीकिनारे धोक्यात; जेटी बांधकामामुळे नदीपात्र बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 4:15 AM