शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

शासनाच्या धोरणामुळे गृहप्रकल्पांना खीळ

By admin | Published: July 12, 2015 10:26 PM

शासन व सिडकोच्या वेळोवेळी बदलणाऱ्या धोरणांमुळे बांधकाम उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळे अनेक गृहप्रकल्पांना खीळ बसली आहे.

नवी मुंबई : शासन व सिडकोच्या वेळोवेळी बदलणाऱ्या धोरणांमुळे बांधकाम उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळे अनेक गृहप्रकल्पांना खीळ बसली आहे. जमिनीच्या किमती वाढत आहेत. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांच्या बजेटमधील घरांना ब्रेक लागला आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर शासनाने पर्यायाने सिडकोने विकासकांच्या बाबतीत सकारात्मक धोरण अवलंबिण्याची गरज आहे, असे मत बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न, त्यांच्यासमोरील अडचणी व घरांच्या वाढत जाणाऱ्या किमती आदी विषयांवर विकासकांच्या प्रतिनिधींनी लोकमत व्यासपीठ या उपक्रमांतर्गत दिलखुलास गप्पा मारल्या.सध्या अतिक्रमणांचा प्रश्न गाजत आहे. नवी मुंबईसह, उरण आणि पनवेल तालुक्यांतील बेकायदा इमारतींवर सिडकोने कारवाई मोहीम सुरू केली आहे. असे असले तरी या अतिक्रमणांना सर्वस्वी सिडकोचे वेळकाढूपणाचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप नयना बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी केला आहे. बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून सिडकोच्या नयना क्षेत्राकडे पाहिले जाते. मात्र दोन वर्षे उलटली तरी सिडकोने या विभागाचा विकास आराखडा तयार केलेला नाही. त्यामुळे या परिसरात अनेक प्रस्तावित गृहप्रकल्प रखडले आहेत. मागील दोन वर्षांत केवळ आठ ते दहा बांधकाम परवानग्या देण्यात आल्या आहेत. त्याही जुन्याच नियमानुसार म्हणजेच एमएमआरडीएच्या कालबाह्य ठरलेल्या विकास आराखड्यानुसार दिल्या जात आहे. ही बाब बजेटमधील घरांना मारक ठरत असल्याचे मत बाविस्कर यांनी व्यक्त केले आहे.शासनाचे गृहबांधणी धोरण काही प्रमाणात समतोल असले तरी अनेकदा त्याची अंमलबजावणी होत नाही. सिडकोच्या माध्यमातून वेळोवेळी बदल होणाऱ्या धोरणांत अनेकदा विसंगती असल्याचे आढळून आले आहे. त्याचा फटकासुध्दा बांधकाम उद्योगाला बसला आहे. त्यामुळे सिडकोने व्यापारी वृत्ती सोडून बजेटमधील घरांसाठी ठोस धोरण आखण्याची गरज असल्याचे मत क्रेडाई-बीएएनएमचे सेक्रेटरी धर्मेंद्र कारीया यांनी व्यक्त केले आहे. एकूणच बजेटमधील घरांची वाढती निकड लक्षात घेऊन सिडकोने धोरण बदलायला हवे, अशी अपेक्षा नयना बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशनचे खजिनदार दिलीप वढावकर यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)