अतिवृष्टीमुळे रसायनी पोलीस ठाण्यात पाणीच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:56 PM2019-08-04T23:56:25+5:302019-08-04T23:56:37+5:30
गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे.
मोहोपाडा : गेले दहा दिवस पावसाने चांगलाच कहर केला आहे; मात्र गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. रविवारी दुपारपर्यंत ठिकठिकाणी पाणी साचल्याने सतर्कं तेचा इशारा देण्यात आला होता. नदीच्या थोडयाच अंतरावर असणाºया रसायनी पोलीस ठाण्याच्या आवारात रविवारी सकाळच्या सुमारास तीन फुट पाणी साचल्याने पोलीस ठाण्यातील विविध साहित्याचे मोठे नुकसान झाले.
रसायनी व आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सर्वं सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता. रविवारी पहाटेपासून दुपारपर्यंत वीजही गायब होती.
शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने रविवारी पहाटेच्या सुमारास रसायनी व आसपासच्या परिसरात पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. रविवारी पहाटे रसायनी पोलीस ठाण्याच्या आवारात पाणी शिरले. तीन फुट पाण्याची पातळी वाढल्याने ८ टेबल, ३ बेड, २० खुच्यांचे नुकसान झाले. तसेच लॅपटॉप, संगणक, दस्तऐवज आदी साहित्य खराब झाल्याचे रसायनी पोलिसांनी सांगितले; मात्र रविवारी दुपारी रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने कामकाज व्यवस्थितरीत्या सुरू झाले.