निधी नसल्याने विकासकामे ठप्प - पंडित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 02:32 AM2019-03-31T02:32:10+5:302019-03-31T02:32:28+5:30

मुरुड शहरातील शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते

Due to lack of funds, development works jam - Pandit Patil | निधी नसल्याने विकासकामे ठप्प - पंडित पाटील

निधी नसल्याने विकासकामे ठप्प - पंडित पाटील

Next

मुरुड जंजिरा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठ्या प्रकल्पासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याचे सांगतात. राज्य सरकारकडूनही तशाच घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात विकासकामांसाठी निधी न आल्याने अनेक कामे रखडली आहेत. राज्य सरकारच्या सी.आर.एफ. फंडाचे दोन हजार कोटी रु पये येणे बाकी आहेत. जिल्ह्यातील कोट्यवधी खर्च असलेले रस्ते मंजूर केले; परंतु जिल्ह्याला पैसे लाखांत येत असतील तर रस्त्याची कामे जलद गतीने कशी पूर्ण होणार? याशिवाय भारतीय ब्रॅण्ड असलेले डांबर रस्त्यासाठी वापरण्यास सांगितले जाते. सध्या या डांबराचा तुटवडा असल्याने कामे वेळेत पूर्ण होत नाही. याबाबत नागरिकांनी मंत्र्यांना जाब विचारणे गरजेचे आहे. खोट्या भूलथापांना बळी न पडता मतदान करावे, असे प्रतिपादन अलिबाग मुरुडचे आमदार पंडित पाटील यांनी केले.

मुरुड शहरातील शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर नगरसेवक मनोज भगत, आशिष दिवेकर, महिला व बालकल्याण सभापती प्रांजली मकू, रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले, सागरकन्या मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकू, जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार, माजी सरपंच अजित कासार आदी उपस्थित होते.
शहरातील जनतेने शिवसेनेला एकहाती सत्ता दिली. तरीही निधीअभावी विकासकामे झाली नाहीत. भाजपाच्या काळात प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्यात आला आहे. हे सरकार श्रीमंतांचे असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

नवीद अंतुले हे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे पुत्र आहेत. काँग्रेस पक्षाने अंतुले यांना मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बनवले. मात्र, त्यांच्या मुलाने शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाने दिलेल्या योगदानाचा त्याला विसर पडल्याचे पाटील यांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्षाचे मुरु ड तालुका चिटणीस मनोज भगत यांनी भाषणात, कार्यकर्त्यांनी घराघरांत प्रचार करून लोकांची मते वळवली पाहिजेत. बूथ कार्यकर्त्यांनी मुरु ड नगरपरिषद निवडणुकीप्रमाणे काम करून शहरात जास्तीत जास्त मते पाडण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन केले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन श्रीकांत सुर्वे तर आशिष दिवेकर यांनी आभार मानले.
 

Web Title: Due to lack of funds, development works jam - Pandit Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.