सरकारी रुग्णालयात डॉक्टर सेवा देत नसल्याने हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:53 PM2019-01-03T23:53:55+5:302019-01-03T23:54:05+5:30
ग्रामीण भागातील गोरगरिबांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने तालुका स्तरावर ग्रामीण रु ग्णालय सुरू करून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे.
- अरुण जंगम
म्हसळा : ग्रामीण भागातील गोरगरिबांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने तालुका स्तरावर ग्रामीण रु ग्णालय सुरू करून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. परंतु रुग्णालयात नेमलेल्या वैद्यकीय अधिकारी सेवा देत नसल्याने शासनाच्या रु ग्ण सेवा योजनांचा व धोरणाचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र म्हसळा ग्रामीण रुग्णालय पहायला मिळते. या दवाखान्यात रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी शल्यचिकित्सक अलिबाग रायगड डॉ. गवळी यांनी डॉ महेश मेहता यांना उपजिल्हा रु ग्णालय श्रीवर्धन येथुन ग्रामीण रु ग्णालयातून कार्यमुक्त केले असून तसे आदेशही दिले. परंतु मेहता यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप म्हसळा पंचायत समतिीचे माजी सभापती महादेव पाटील यांनी केला आहे. मेहता यांनी म्हसळा ग्रामीण रु ग्णालयाचा कार्यभारच न स्वीकारल्याने गेल्या सात मिहन्यात ग्रामीण भागातील गरीब रु ग्णाचे हाल होत आहेत. लेखी आदेश असताना डॉ मेहता यांनी सेवा न केल्याने शासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी महादेव पाटील यांनी डॉ.गवळी यांचेकडे केली आहे.
म्हसळा ग्रामीण रु ग्णालयात नवशिकाऊ डॉक्टर कार्यरत असल्याने गेल्या सात मिहन्यात बाळंतपणाच्या दोन केसेस मध्ये नवजात अर्भक मयत झाल्याच्या घटना घडल्या आहेत येथे प्रतिनियुक्तीवर असलेले डॉक्टर हजर असते तर या घटना घडल्या नसत्या, असे पाटील यांनी नमूद केले.
म्हसळा तालुक्यात एसटी स्थानकाशेजारीच भव्य इमारतीत ३० खाटाचे सुसज्ज ग्रामीण रु ग्णालय पाच वर्षापुर्वी उभारण्यात आले आहे. परंतु हा दवाखाना कार्यान्वीत झाल्यापासुन अडथळेच अडथळे निर्माण झाले आहेत. येथे नेमणुक केलेले वैद्यकीय अधिकारी खासगी व्यवसायात गुंतल्याने शासनाची सेवा देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे रु ग्णांची हेळसांड होत आहे. स्थानिक प्रशासन, सत्ताधारी शासन आण िसर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी यांचा दुर्लक्ष होत असल्याने म्हसळा ग्रामीण रु ग्णालय फक्त नावाला असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.