शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

दियाच्या हत्येप्रकरणी गावातील तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 2:49 AM

माणगाव तालुक्यातील वावे येथील आठ वर्षीय बालिका दिया जाईलकर हिच्या निर्घृण खून प्रकरणातील पहिल्या आरोपीला माणगाव पोलिसांनी अटक केली आहे

माणगाव : माणगाव तालुक्यातील वावे येथील आठ वर्षीय बालिका दिया जाईलकर हिच्या निर्घृण खून प्रकरणातील पहिल्या आरोपीला माणगाव पोलिसांनी अटक केली आहे. गावातील २२ वर्षीय नराधम तरु णाने हे कृत्य केल्याचे उघड झाले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.येत्या दोन दिवसांत इतर आरोपींना पकडण्यात येईल, असा विश्वास माणगाव पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वावे येथील दिया जयेंद्र जाईलकर ही २५ मे रोजी बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्यानंतर २८ मे रोजी चार दिवसांनी तिचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या पडक्या घरात कुजलेल्या स्थितीत सापडला. दियाच्या हत्येमुळे माणगाव तालुक्यातील संतापाचे वातावरण होते. दियाला न्याय मिळवून देण्यासाठी ठिकठिकाणी कडकडीत बंद, मूक मोर्चे काढून व आरोपीचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला होता.दियाच्या बेपत्ता प्रकरणी पोलिसांनी दहा ते बारा संशयितांची धरपकड करीत चौकशी केली. चौथ्या दिवशी वावे येथील सूरज सहदेव करकरे (२२) या तरु णाला पोलिसांनी अटक केली. त्याने दियाची हत्या केल्याची कबुली जबाब पोलिसांना दिला आहे. मात्र हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अजूनही पाच ते सात संशयितांची चौकशी सुरू असून लवकरच सर्व आरोपी जेरबंद होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.