कर्जत : तालुक्यातील वदप गावातील तलावात राजनाल्याचे पाणी शिरून तलाव ओव्हरफ्लो झाला. यामुळे आजूबाजूचा परिसर जलमय झाला असून कडधान्याच्या शेतीला याचा मोठा फटका बसला आहे.
वदप ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तलावातील गाळ सुमारे दीड महिन्याभरापूर्वी काढण्यात आला होता. मात्र गाळ साफ करून झाल्यावर तलावातील अधिकचे पाणी बाहेर काढण्यासाठी जो आउटलेट काढणे गरजेचे होते ते नीट काढण्यात आले नाही, तसेच तलावाच्या बाजूनेच वाहणाऱ्या राजनाल्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याने त्यातूनही तलावात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बुधवारी सकाळी ९च्या सुमारास हा तलाव ओव्हरफ्लो झाला आणि गावात तसेच आजूबाजूच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेली वाल, मूग, हरभरा, चवळीची शेती या पाण्यात वाहून गेली. परिणामी शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वाया गेल्याने आर्थिक संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
राजनाल्याचे पाणी तलावात झिरपत असल्याचे आणि तलावाला योग्य आउटलेट काढण्याबाबत गावकºयांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीला सांगितले. मात्र, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यानेच आज ही परिस्थिती ओढवली, त्यांचा हलगर्जीपणा आम्हाला भोवला, माझ्या वालाच्या शेतीचे नुकसान झाले.- नितेश पाटील, शेतकरीशेतकरी चिंताग्रस्तच्तलाव ओव्हरफ्लो झाल्याने वादप येथील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. १७ शेतकºयांच्या शेतामध्ये पाणी शिरल्याने एकू ण २५ एकर शेतातील हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून हे नुकसानकसे भरून काढायचे या विवंचनेत आहे.काही दिवसांपूर्वी तलावातील गाळ काढल्याने पाण्याची साठवण क्षमता वाढली, राजनाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात तलावात झिरपल्याने तलाव ओव्हरफ्लो झाला याला जलसंपदा विभागच जबाबदार आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.- नीरा विचारे, सरपंचया संदर्भात राजनाला विभागाच्या अधिकाºयांना योग्य सूचना दिल्यात, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत