पेण : पेणच्या पश्चिम भागात मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम जलद गतीने सुरू आहे. रस्ता रुंदीकरणात महामार्गाची उंची जागोजागी वाढली आहे. जुलै महिन्यात होणारी अतिवृष्टी व समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे डोंगरपट्ट्यातून येणारे पाणी नद्यामधून समुद्र-खाड्यामध्ये जाते; परंतु रुंदीकरणासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पेणच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसमोर ही परिस्थिती हाताळण्याचे आव्हान येत्या काही दिवसांत उभे राहणार आहे.वडखळ ग्रामपंचायती हद्दीतील लोकवस्तीला याचा सर्वात जास्त फटका बसणार आहे. रुंदीकरणासाठी केलेला भराव व शेतामध्ये केलेल्या मातीच्या भरावामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी आलेले नाले बुजले आहेत. त्यामुळे हे पाणी वडखळ हद्दीत तुंबून गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.राष्टÑीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या टप्प्याचे २०१७ पासून काम सुरू झाले. त्यामध्ये पहिला मुहूर्त १६ जून २०१४, दुसरा मुहूर्त ३१ मार्च २०१६, तिसरा मुहूर्त ३१ मार्च २०१८ होता, तरीही आजपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. सध्या उच्च न्यायालयात जून २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले असून कामाच्या अंतिम मुदतीनंतरही बरीच कामे बाकी आहे. सध्या जागोजागी साकव, उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. पेण शहराच्या पश्चिम बाजूकडील राष्टÑीय महामार्गाच्या भरावाची उंची रामवाडी पुलाजवळ तब्बल अंदाजे ३० ते ३४ फूट इतकी ठिकाणी आहे. तर वडखळ बायपासचे उंच झालेले भराव तसेच धरमतर खाडीकिनारच्या परिसरात शेतीमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या भरावामुळे वडखळच्या इंद्रनगर, नवेगाव या डोंगरपट्टीतून येणारे पावसाचे पाणी वडखळ गावात पाणी तुंबणार आहे.पेण शहरालगत भोगावती नदीपात्रातून येणारे डोंगरपट्टीमधील पावसाच्या पाण्याचा प्रवाह वितरण व्यवस्थेत मोठा अटकाव निर्माण करणारा आहे. महसूल यंत्रणेने या परिस्थितीचा अहवाल वरिष्ठांना देणे गरजेचे आहे. याबाबत वडखळ ग्रामपंचायत सरपंच राजेश मोकल व ग्रामविकास अधिकारी यांनी संभाव्य धोके लक्षात घेऊन या बाबत रायगड जिल्हाधिकारी, पेण प्रांत अधिकारी, पेण तहसीलदार यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.पळस्पे-इंद्रापूर राष्टÑीय महामार्गाचा ८४ कि.मी. टप्पा असून, महामार्गाच्या भरावाचे काम पेण खारपाडा ते पेण आमटेमपर्यंत पूर्ण झालेले आहे. बºयाच ठिकाणच्या साकव व मोरींचे काम तसेच उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्या ठिकाणी दररोज वाहतूककोंडीचा सामना प्रवासी व वाहनचालकांना करावा लागत आहे.
रुंदीकरणाच्या भरावामुळे वडखळमध्ये पुराचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 12:11 AM