- दीपक साळुंखे बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडीनजीकच्या काळ नदीपात्राच्या पाण्याला प्रदूषणामुळे काळा रंग आला आहे. त्यामुळे परिसरातील चौदा गावांच्या नळपाणीपुरवठा योजना अडचणीत सापडल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार पत्रव्यवहार करून देखील समस्या जैसे थे असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.बिरवाडी काळ नदीपात्रावर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधून पाणी अडवून जॅकवेलद्वारे चौदा गावातील नळपाणी पुरवठा योजना कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. मात्र कारखान्यांचे प्रदूषित सांडपाणी व नागरी वस्तीतील सांडपाणी बिरवाडी काळ नदीपात्रात मिसळते. परिणामी नदीवरून कार्यरत असणाऱ्या पाणी योजना अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे या नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारे चौदा गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नागनाथ अरु ण घाडगे यांच्याजवळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, बिरवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचाºयांमार्फत बिरवाडी काळ नदीपात्रातील पाणी काळ्या रंगाचे झाल्याची माहिती ८ डिसेंबर रोजी प्राप्त झाली असून नेमके पाणी कशामुळे काळे झाले याकरिता पाण्याचे नमुने तपासणीकरिता आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील उपाययोजना ग्रामपंचायत प्रशासनामार्फत करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.सांडपाणी नदीत मिसळलेप्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी प्रकाश ताटे यांच्याजवळ संपर्क साधला असता बिरवाडी ग्रामपंचायतीसह काळ नदीपात्रावरील ग्रामपंचायतींना नोटिसा बजाविण्यात आल्या असून नागरी वस्तीतील सांडपाणी नदीपात्रात मिसळू नये याकरिता उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच नागरी वस्तीतील सांडपाण्यावर प्रक्रि या करण्याकरिता एमआयडीसीने यंत्रणा उभारावी अशी मागणी ग्रामपंचायतींकडून संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे करण्यात करण्यात आली आहे. मात्र या मागणीची पूर्तता अद्याप झाली नसल्याने नागरी वस्तीतील सांडपाणी नदीपात्रात मिसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे क्षेत्राधिकारी ताटे यांनी स्पष्ट केले.महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रातील पाण्याला आलेल्या काळा रंग चिंतेची बाब असून या प्रकरणी संबंधितांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी बिरवाडीमधील नागरिक मयूर रामराव मोरे यांनी केली आहे.
बिरवाडीत प्रदूषणामुळे काळ नदीपात्रातील पाण्याचा रंग बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:31 AM