शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

खड्ड्यांमुळे श्रीवर्धनच्या पर्यटनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 3:24 AM

अपघातांत वाढ; वर्षाला एक कोटी ४० लाख पर्यटन निधी प्राप्त

श्रीवर्धन : तालुक्यातील सर्व मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. श्रीवर्धन ते बागमांडला २४ किलोमीटर अंतर आहे. सदर मार्गावर हरिहरेश्वर हे तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे. श्रीवर्धन कोलमांडला मार्गे बागमांडला रस्त्याची अवस्था बिकट असल्यामुळे पर्यटकांनी या रस्त्याकडे पाठ फिरवली आहे.गालसुरे, साखरी, जावेळे, धारवली व आडी या मार्गावर वाहतुकीचे प्रमाणही कमी झाले आहे. श्रीवर्धन-दिघी हे ३० किलोमीटर अंतर आहे. आराठी ग्रामपंचायत ते दिघी सर्वत्र खड्डेच खड्डे दृष्टीस पडतात. लाल माती व चिखल यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. श्रीवर्धन ते दिघी दरम्यान चिखलप, शिरवणे, हुन्नरवेल, दांडगुरी, आसुफ, खुजारे, बोर्लीपंचतन, वडवली, वेळास व कुडगाव ही मुख्य गावे आहेत.दांडगुरी ते बोर्लीपंचतन रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मातीच्या भरावामुळे वाहने चिखलात रुतण्याची दाट शक्यता आहे. बोर्लीपंचतन ते वांजळे दरम्यान खड्ड्यांची संख्या वाढल्यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागते आहे. रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर न केल्यास वांजळे मार्गावरील एसटी वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका विद्यार्थी व वांजळे ग्रामस्थांना बसू शकतो, कारण दुसरी दळणवळणाची व्यवस्था उपलब्ध नाही.धनगरमलई, नागलोली, बोर्ला, वावे रस्त्यावर लाल मातीमुळे चिखल झाला आहे. अगोदर खड्डे व पावसामुळे डोंगराची लाल माती यामुळे वाहने घसरून अपघाताचा धोका वाढला आहे. दिघी पोर्टच्या म्हसळा गोनघर मार्गाचीही अवजड वाहतुकीमुळे चाळण झाली आहे. तसेच श्रीवर्धन शेखार्डीमार्गे दिवेआगार रस्ता वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत आहे. सदर रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न निर्माण झाला आहे.त्याचा त्रास दिवेआगरच्या गणेश दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस व वाहनचालक बेजार झाले आहेत.श्रीवर्धन तालुक्यात पर्यटनास वाव मिळत आहे. त्यामुळे लाखो पर्यटक श्रीवर्धन भेटीस येतात. श्रीवर्धन शहर, हरिहरेश्वर, दिवेआगर, दिघी ही पर्यटकांच्या आवडीची ठिकाणे आहेत. त्या कारणास्तव लाखो रु पयांचा पर्यटक निधी तालुक्यास प्राप्त होत आहे. हरिहरेश्वर ग्रामपंचायतीला प्रत्येक वर्षी जवळपास तीन लाखांचा पर्यटन निधी प्राप्त होत आहे. श्रीवर्धन नगरपरिषद महिन्याला ७० हजार रु पयांचा पर्यटन निधी जमा करत आहे. तसेच सुवर्ण गणेशाचे दिवेआगर वर्षाला तीन लाख रु पये पर्यटकांकडून मिळवत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेची जबाबदारी मुख्यत्वे कुणाची आहे, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकाला एसटी चालवताना अनेक अडचणी येत असून अपघातांचा धोका वाढला आहे. यासंदर्भात राज्य परिवहन मंडळाकडेही तक्रारी करण्यात आल्या आहेत. रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करण्यात यावी.- राजेंद्र बडे, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना, श्रीवर्धनश्रीवर्धन ते बोर्लीपंचतन मार्गावर विक्र म रिक्षाची वाहतूक नियमित सुरू असते. रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीचा भराव डांबरी रस्त्यावर येत आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला असून खड्ड्यांमुळे वाहनांमध्ये बिघाड होत आहे.- अविनाश मोरे, अध्यक्ष, विक्र म चालक-मालक संघटना,बोर्लीपंचतन ते दिघी रस्ता वाहतुकीस पूर्णपणे अयोग्य आहे. त्यामुळे प्रवासी व स्थानिक लोक यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. लोकांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.- चंद्रकांत पांडुरंग बिराडी, तंटामुक्त गाव अध्यक्ष, वडवलीसार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील सर्व रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दिघी व म्हसळा रस्ता भयानक बनला आहे.लवकरच खड्डे बांधकाम खात्याने बुजवावेत, अन्यथा जनतेत उद्रेक होईल .- श्याम भोकरे, शिवसेना, जिल्हा उपप्रमुख, रायगडदिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीमुळे वडवली रस्ता खराब झाला आहे. दिघी पोर्टने सदर रस्त्यावरील खड्डे बुजवणे आवश्यक आहे. हा रस्ता हा सिमेंटचा बांधणे गरजेचा आहे. दिघी पोर्टने जनभावना लक्षात घेऊन काम सुरू करावे.- दर्शन विचारे, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी, श्रीवर्धन

टॅग्स :RaigadरायगडPotholeखड्डे