जयंत धुळप -
रायगड - शुक्रवारी मृग नंक्षत्रावर रायगड जिल्हयात सुरु झालेल्या मान्सूनच्या पावसाने जाेर धरला असून, शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात मुरुड येथे सर्वाधिक १३४ मिमी तर पनवेल येथे १३१ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. सातत्यपूर्ण पावसामुळे वाहतूक काहीशी विस्कळीत हाेत असली तर निसर्ग मात्र हिरवी शाल पांघरु लागला आहे.
दरम्यान जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी अलिबाग-४४, पेण-३८,उरण-७२,कर्जत-१२.२०, खालापूर-४४,माणगांव-६०, राेहा-४२,सुधागड-२०,तळा-५५,महाड-४०,पाेलादपूर-३९,म्हसळा-९५.२०,श्रीवर्धन-९५.२०, आणि माथेरान येथे २७.५० मिमी पावसांची नाेंद झाली आहे. जिल्ह्य़ाचे सरासरी पर्जन्यमान ५९.४२ मिमी आहे.
काेकण रेल्वे प्रशासनाने सुरक्षीततेची उपाययाेजना म्हणून रायगड,रत्नागीरी व सिंधूदूर्ग जिल्हयातील प्रवासात आपल्या ट्रेनचा वेग नियंत्रिक केला आहे. परिणामी काेकण रेल्वे काहीशा विलंबाने धावत आहे. काेकण रेल्वे मार्गाच्या दूतर्फाच्या परिसरातील हिरवीगार झालेली वनराई अनूभवण्यात प्रवाशांना माेठा आनंद वाटत आहे. गाेवा राष्ट्रीय महामागार्वर एसटीच्या संपामुळे वाहतूक काही प्रमाणात कमी असली तर उर्वरित वाहनांची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.